August 8, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

उमरी येथे महा.वि.अ.च्या विरोधात भाजपाच्या वतिने रास्तारोको महाएल्गार आंदोलन संपन्न

नांदेड, दि,१ ( राजेश एन भांगे ) – दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे. आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे यासाठी भाजपा तर्फे उमरी येथे आज १ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले. सध्याची निसर्गाची परिस्थिती व जनावारांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती व उन्हाळ्यात निर्माण होणारा वैरणाचा प्रश्न हे सर्व पाहता दूध उत्पादक शेतकरी व दुध उत्पादक हा अतिशय अडचणीत सापडलेला असताना त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसलीच मदत मिळत नसल्यामुळे महायुतीच्या वतीने २१ जुलै २०२० ला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आतापर्यंत दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा व महायुतीच्या वतीने करण्यात आले. नायगाव विधानसभेचे आमदार श्री राजेश पवार यांच्या आदेशा नुसार जिल्हा परिषद सदस्या सौ, पुनमताई राजेश पवार भाजपा जिल्हा चिटणीस बालाजी पाटील ढगे यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात सुरक्षित अंतर ठेवून मास्क, सॅनेटायझरचा वापर करून भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होऊन सकाळी 10.30 वाजता उमरी येथे भोकर रोडवर चौकात राज्य शासना विरोधात घोषणा देण्यात आले. व नंतर तहसीलदार बोथीकर यांना मागण्यांचे निवेदन सौ. पुनमताई राजेश पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा नेते बालाजीराव बच्चेवार, भाजपा ता.अध्यक्ष गणेशराव गाढे, शहराध्यक्ष विष्णु पंडीत, महीला आघाडीच्या विद्याताई अग्रवाल, शिवाजी हेमके, शाम लापशेटवार,गजानन श्रीरामवार, दत्ता पाटील जाधव तळेगावकर, ज्ञानेश्वर पाटील सावंत, बालाजी पाटील ढगे, रुस्तुम पाटील बेलकर, सोमनाथ हेमके, साहेबराव कदम, कैलास पांचाळ, देविदास पटणे, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!