
लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी
महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाच्या मराठवाडा विभाग प्रसिद्ध प्रमुख तसेच सोशल मिडिया प्रमुख पदी घनसावंगी येथील पत्रकार संतोष विलासराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी ही नियुक्ती केली.
संतोष शिंदे यांनी पत्रकार म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्रातील परीट (धोबी) समाजाला शासन दरबारी सातत्याने उपेक्षित वागणूक मिळाली. समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे यासाठी आपल्या संघटनेचा लढा दिवसेंदिवस प्रभावी होत आहे. आपण सोशल मिडिया आणि प्रसिद्धी माध्यमाची ताकद जाणून आहात. समाजाचा लढा उभारताना आपण संघटनेच्या प्रयत्नांना व प्रश्नांना वाचा फोडावी म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल प्रदेश महासचिव संजय भिलकर, कार्याध्यक्ष गणेशराव जगताप, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शंकरराव बनसोडे,आदींनी त्यांचे अभिनंदन केले.











































