Home मराठवाडा जालना जिल्हालात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू; एकूण बळींची संख्या ६० वर

जालना जिल्हालात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू; एकूण बळींची संख्या ६० वर

107

गौरव बुट्टे – प्रतिनिधी

जालना – आज दि २६ रोजी रात्री उशिराने ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता १९४६ वर पोचला आहे. तर आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६० झाली आहे.

*या भागांतील रुग्णांचा समावेश*
यांमध्ये जालना शहरातील ३६ रुग्ण ज्यांचे पूर्ण पत्ते नाहीत तर उर्वरित मध्ये सर्वाधिक रुग्ण मिशन हॉस्पिटल परिसर ,विठ्ठल मंदिर कसबा,भीमनगर, प्रशांत नगर प्रत्येकी 3,चरवाईपुरा, राम नगर, मराठा बील्डिंग प्रत्येकी 2,लक्कडकोट, गणपती गल्ली, हनुमान घाट, सिव्हिल हॉस्पिटल, आनंदवाडी राम मंदिर,गुरुकृपा कॉलनी, यशवंत नगर, समर्थ नगर, विद्या नगर, चंदनझिरा, आजाद मैदान, म्हाडा कॉलनी शिवाजीनगर, गीतांजलि कॉलनी, शास्त्री मोहल्ला प्रत्येकी 1, तर उर्वरित बुटखेड़ा 6, केदारखेड़ा 4, कॉटन मार्केट मेहकर 3, खामगाव 2, शहागड, पळसखेडा सिंदखेडराजा , देवमूर्ती, हिसवन खुर्द, साष्टी पिंपळगाव, गारखेडा औरंगाबाद प्रत्येकी 1 असे एकूण ८९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.