Home जळगाव पाचोरा येथिल साईमोक्ष क्वारंटाईन सेन्टर मध्ये एका ३३ वर्षीय युवकाने गळफास घेवून...

पाचोरा येथिल साईमोक्ष क्वारंटाईन सेन्टर मध्ये एका ३३ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या

195

निखिल मोर

पाचोरा – शहरातील कोविड१९- साईमोक्ष क्वारंटाईन सेन्टर मध्ये काल मध्य रात्री तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील एका ३३ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या युवकाला १९ जुलै रोजी साईमोक्ष क्वारंटाईन सेन्टर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते , या युवकाचे स्वब तपासणीसाठी २० रोजी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. घटनास्थळी रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली.सदर युवकावर शासकीय प्रोटोकाल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.युवकाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.