Home विदर्भ तंगावा तोडुन पोल पाडणार्यास ” कंपनी “चा दणका

तंगावा तोडुन पोल पाडणार्यास ” कंपनी “चा दणका

191

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यातील मंगरूळच्या साखर कारखान्या मागील शिवारात शेतशेजार्याने धुर्यावरील तंगावा तोडुन विजेचा खांब तोडल्याची घटना नुकतीच घडली.

शेतात पेरणी सुरू असतांनाच मोतीराम गोबराजी जाधव यांचे शेतात विजेच्या जिवंत तारा पडल्या. दरम्यान वृद्ध शेतकरी दांपत्य आणि शेतमजुर बालंबाल बचावले. 11 जुन रोजी घडलेल्या या गंभीर घटनेची ,विज वितरण कंपनीचे आरणी विभागीय ऊप कार्यकारी अभियंता राऊत यांचेकडे तक्रार दाखल आली .त्यांनी तातडीने पाऊल ऊचलत, स्थानिक लाईनमनची कानऊघडणी केली. आणि त्यांनी जवळा विभागीय प्रभारी सहाय्यक अभियंता गुल्हाणे यांना चौकशीचे निर्देश दिले. 16 जुन रोजी त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन सविस्तर अहवाल कारवाई साठी ऊप विभागा कडे पाठवला. वितरण कंपनीने तंगावा तोडुन पोल पाडणार्या संजय लक्ष्मण घनाडे ( वय 45 ) रा.बेलोरा ता.यवतमाळ यांना 26 जुन रोजी दंडात्मक रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवली, मुदतीच्या आत रक्कम न भरल्यास, विज वितरण कंपनी च्या नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात करण्यात येईल असे ऊप कार्यकारी अभियंता राऊत यांनी बजावताच, घटनेतील दोषी ईसम ताळ्यावर आला. आणि त्याने कंपनीच्या लेखाविभागात 16जुलै रोजी दंडात्मक रक्कम रुपये 4200 भरले. सध्या विद्युत पुरवठा सुरळीत सुरु आहे. परिसरातील शेतकर्यांकडुन लोकवर्गणी वसुल करुन सदर काम करण्यात आले हे विशेष..!

या घटनेमध्ये शेतकर्यांना नाहक ञास आणि आर्थिक भुर्दंड बसल्याने संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणातील दोषी संजय लक्ष्मण घनाडे शेतशेजारी असलेल्या वृध्द दांपत्याला धमकावत आहे. त्याच्या कडुन जीवाला धोका असल्याचे या दांपत्याचे म्हणणे आहे.