मराठवाडा

टेंभुर्णी जवळील अपघातात एक जण ठार एक जण गंभीर जखमी.

Advertisements
Advertisements

हेल्मेट ही झाले चकना चूर.

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जाफ्राबाद तालुक्यातील हिवरा बळी येथील दोन युवक औरंगाबाद येथील दवाखान्यामध्ये उपचार घेऊन दुचाकीवरून परत येत असताना अकोला देव चौफुलीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरा बळी येथील अमोल लोखंडे याला औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात चेक अप साठी कृष्णा लोखंडे दुचाकीवर घेऊन गेले होते. दरम्यान तपासणी करून आपल्या गावाकडे परतत असताना टेंभुर्णी / देऊलगांवराजा रोडवर अकोला देव चौफुलीवर भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यामध्ये कृष्णा संतोष लोखंडे ( वय 32 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला तर अमोल दगडुबा लोखंडे (वय 29 वर्षे) हा गंभीररीत्या जखमी झाला. दोघांनाही तातडीने अकोला देव येथील युवकांनी टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .दरम्यान डॉ. अमोल वाघ यांनी त्यांना तपासून कृष्णा यांना मृत घोषित केले तर अमोल लोखंडे यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविले. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे राजेश चव्हाण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी तातडीने रुग्णालयात येऊन नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.
दरम्यान प्रेताची उत्तरीय तपासणी डॉ.अमोल वाघ यांनी केली. शोकाकुल वातावरणात हिवराबळी येथे कृष्णा लोखंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हेल्मेट असल्या मुळे थोडा बचाव झाला असेल असे वाटले नाही.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...