Home नांदेड पेट्रोल-डीजेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्या…!

पेट्रोल-डीजेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्या…!

110

मजहर शेख

माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे राष्ट्रपतींना निवेदन….

नांदेड / माहूर , दि. ३ :- जगावर कोरोना महामारीचे नैसर्गिक संकट कोसळले असतांनाच प्रतिदिन होणारे केंद्रसरकारचे मानवनिर्मित पेट्रोल, डीझेल दरवाढीचे केंद्रसरकार निर्मित संकटाने देशातील सर्वसामान्य जनता होरपळत असल्याने पेट्रोल डीझेलची दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार माहूर यांचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. कॉंग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात माहूर तहसीलदाराना भेटून या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जग सध्या कोरोना महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजूनही पूर्व पदावर आलेले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा प्रसंगी पेट्रोल डीझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करतांना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. 7 जून 2020 पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून 2 जुलै 2020 रोजी पर्यतची दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 9.12 रु. तर डीझेलमध्ये 11.01 रुपयाची वाढ झालेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किमती प्रतीलिटर 87,88 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये डीझेलपेक्षा पेट्रोल महाग आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असतांना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता अंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असतांना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. 2014 मध्ये पेट्रोल उत्पादन शुल्क हे 9.40 रुपये होते. तर डीझेलवर 3.56 रु.होते. सध्या हेच शुल्क पेट्रोल 32.98 रुपये तर डीझेल 31.83 रुपये असे आहे.
अंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल डीझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असतांना महामहीम राष्ट्रपती महोदयांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्रजी केशवे, जि.प.सदस्य तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी माहूर संजय राठोड, आनंद पाटील तुपदाळे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी माहूर, सौ अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, मार्केट कमिटीचे उपसभापती दिलीप मुनगीनवार, मार्केट कमिटीचे संचालक मंचकराव देशमुख,विश्वनाथ कदम,मा.प.स.सदस्य किशन राठोड, नगरसेवक इलियास बावाणी, न.प. चे मा.उपाध्यक्षअ.मुनाफ पटेल,न.प.चे माजी सभापती शिवलिंग टाकळीकर, देवीदास मांजरमकर, सुभाष मार्गमवार, सुभाष क्षीरसागर, रेणुकादास वानखेडे,शेखआयुब शेख महेबूब जगदिश पाटील तुपदाळे, प्रदीप जमदाडे,राजु सौंदलकर,नबी सहाब,सिद्धार्थ तामगाडगे, अब्दुल रब सौदागर,दिपक मुरादे, अजिम सैयद, महंमद हानिफ भाई,निसार कुरेशी,करीम शहा,संजय गायकवाड, सचिन बेहेरे,आबीद खिच्ची, लक्ष्मण बेराडे,जमीर खान,अरविंद खंदारे, शेख जब्बार, शेख लुकमान,काशिनाथ खंदारे,देवीदास भोगाजी आडे,जब्बार भाई, आदी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.