Home मुंबई नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप , शिवसैनिक टीम कोरोना विरोधात लढायला...

नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप , शिवसैनिक टीम कोरोना विरोधात लढायला सज्ज…!

204

सुरेश वाघमारे

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,शिवसेना पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे साहेब व पर्यावरण मंत्री शिवसेना युवा नेते ना. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आता शिवसैनिक सज्ज झाले आहेत. दहिसर येथील प्रभाग क्रमांक १ मधील शिवसैनिक एक टीम कोरोना विरोधात लढायला सज्ज झाली आहे. आज शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना योध्दानी प्रभागातील इमारती मध्ये जाऊन आरोग्य तपासणी बाबत प्रशिक्षण दिले थर्मल गन, ऑक्सिमिटरचा वापर कसा करावा यांचे नागरिकांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तसेच मुंबई बॅंकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या उपस्थितीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या नागरिकांना देण्यात आल्या.
सद्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. मात्र आपल्या विभागात वाढत जाणारी रुग्णसंख्या, अपूरा कर्मचारी वर्ग, कर्मचाऱ्याना होणारी लागण यामुळे महापालिकेवर याचा ताण पडत आहे. त्यांच्या मदतीला आता नेहमी प्रमाणे कोरोना योद्धे गणपत पाटील नगर, आझाद नगर, साईबाबा नगर, शिवशक्ती नगर झोपडपट्टी व जगन्नाथ कॉम्प्लेक्स परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. त्याच बरोबर सर्व इमारती मध्ये आता नागरिकांची तपासणी करून आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. थर्मल गन व प्लस ऑक्सिमिटरच्या साहाय्याने नागरिकांची तपासणी केली जात आहे. या कोरोना योद्धाना थर्मल स्क्रिनिंग करीता थर्मामिटर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी करीता ऑक्सिमिटर देण्यात आले आहेत.
ह्या उपकरणांद्वारे त्यांना महापालिकेच्या आरोग्यसेवकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना मदतनीस म्हणून शिवसैनिक घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करत आहेत.यामुळे ज्यांना रोगाची लक्षणे आहेत अशा रुग्णांना शोधणे आता अधिक सोपे होत आहे. हे योद्धे 100 डिग्री पेक्षा शरीराचे जास्त तापमान आणि ऑक्सिजन 95 लेव्हल कमी असलेल्या नागरिकांची माहिती पालिका आरोग्य विभागास देत आहेत. त्यामुळे या विषाणूंचा फैलाव होण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होत आहे.