Home विदर्भ नगर परीषद पथकांने पकडले अवैधरीत्या तेलंगाना जानारे २४ मजुर

नगर परीषद पथकांने पकडले अवैधरीत्या तेलंगाना जानारे २४ मजुर

201

रात्री २ वाजता निगरानी वर होता पथक

वर्धा – जिल्हा आर्वी तालुका वर्धा जिल्हा हा सध्या ग्रिन झोन मध्ये असल्याने कोरोनाचा शिरकाव वर्धा जिल्ह्यात होउ नये म्हणुन आर्वी तालुक्यातील उपविभागिय अधिकारी व नगर परीषदेचे सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहे.

नगर परीषदचे अभियंता साकेत राऊत तसेच निगरानी पथकातिल पोलिस कर्मचारी यांनी रात्री २ वाजताच्या सुमारास आर्वीत थांबलेला ट्रक गस्ती वेळी पकडला.
यात वरुड येथुन तेलंगाना जानारे २४ मजुर होते. हे मजुर वरुळ येथिलच असुन तेलंगान्याला एका कंपनित काम करायला जात होते.
हे मजुर ट्रकात अक्षरश्या: जनावरा सारखे कोंडले होते त्यांना बाहेर काढल्यानंतर कित्येकाना श्वास देखील घेता येत नव्हता साकेत राऊत यांच्या प्रसंगावधानाने त्या सर्वांची येणारी नामुष्की टळली. तसेच त्यांची समजूत काढून परत वरुड ला जाण्यास प्रेरित करून परत पाठविण्यात आले.

प्रतिनिधि
रविन्द्र साखरे / ईकबाल शेख
९८९०७७७२४२