Home महत्वाची बातमी शेगाव पोलिसांनी अवेध गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली 8 लाखांचा मुद्देमाल जप्त...

शेगाव पोलिसांनी अवेध गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली 8 लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपीस अटक

58
0

8 लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपीस अटक

अमीन शाह

शेगाव : शहरातील श्री अग्रेसन महाराज चौकात शहर पोलिसांनी 27एप्रिल रोजी पहाटे एका बोलेरो गाडीने आलेला प्रतिबंधित गुटखा पकडूवन वाहनासह एकूण 7 लाख 70 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
27 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सकाळी 4
वाजता शेगाव येथील श्री अग्रसेन महाराज चौक येथे एक पांढरे रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप
वाहन थांबवुन वाहन चालकाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव करण सतिष गवळी वय-22 वर्षे रा.
चांदमारी ता. खामगाव असे सांगीतले. त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता महिंद्रा बोलेरो
वाहनामध्ये “वाह पान मसाला गुटखा तंबाखु व पानबहार पानमसाला गुटखा असा एकुन 17 पोते गुटखा माल
किमती 3,70,125/- रुपये व महिंद्रा बोलेरो वाहन किमती 4,00,000/- रुपये असा एकुन 7,70,125/- रुपये
चा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत केले ला गुटखा माल शेगाव शहरामध्ये तसेच जगभरात कोविड 19 च्या
वाढत्या प्रार्दुभावामुळे लॉकडावुन करण्यात आलेले असल्याची जाणीव असतांना सुध्दा अवैधरित्या वाहतुक सुरू आहे