Home मुंबई रेशन दुकानदाराला पाठीशी घालणारा अधिकारी बोरोडे वर निलंबनाची तात्काळ कारवाई करा अन्यथा...

रेशन दुकानदाराला पाठीशी घालणारा अधिकारी बोरोडे वर निलंबनाची तात्काळ कारवाई करा अन्यथा अन्न त्याग आंदोलन करणार – सुरेश वाघमारेंचा निर्वाणीचा इशारा

64
0

मुंबई , ( प्रतिनिधी ) – कोरोनाच्या आणीबाणीत सरकारने सर्वांना अन्न धान्य मिळावे म्हणून रेशन दुकानदारांना सक्त निर्देश दिले तरी सुद्धा दुकानदार नियमाचे पालन करत नसल्याच्या घटना घडत आहेत असाच गंभीर प्रकार मालाड पश्चिम येथील रातोडीगाव दुकान क्रमांक ४२ग १९४ या दुकानातील काळा बाजार उघड करूनही अदयाप काहीही कारवाई सदर दुकानदारावर झालेली नसून याउलट निरीक्षक अभिजित बोरोडे नी सुरेश वाघमारे यांना फ़ोन वरून रेशन बद्दल केलेल बेजबाबदार वक्तव्य ” तुम्ही तुमच बघा लोकांचं सोडा हो आणि केलीली तक्रार माघे घ्या अशी दरडावत केलेली भाषा एका जबाबदार अधिकाऱ्याला अशोभनीय असून याबाबत तक्रार दार सुरेश वाघमारे यांनी या उर्मट अधिकारी व काळाबाजार करणाऱ्या हक्काचं रेशन नाकारणाऱ्या पावती न देणं दुकान सतत बंद ठेवीत शिधाधारकांना वेठीस धरणे या सारख्या गंभीर घटनेबाबत सोशल मीडिया व वतर्मानपत्राद्वारे पोलखोल करून आज ८ दिवस पूर्ण होऊन गेले तरी अद्याप कुठली कारवाई झालेली नाही खातेनिहाय चौकशी होत असल्याने वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकारी अभिजत बोरोडेना व भ्रष्ट दुकानदाराला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे जर या अधिकाऱ्यांना वेळीच जरब नाही मिळाली तर हा रेशनमधला भ्रष्टचारी अधिकारी राजरोसपणे काळाबाजारी वाढतं जाईल या सर्व घटनेचा तपास रेशन खातेनिहाय होतं असलेली चौकशी संशयास्पद दिसत असून या घटनेला पायबंद घालण्यासाठी तक्रादार सुरेश वाघमारे यांनी कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे अखेर मालाड रेशन च्या काळाबाजारी विरुद्ध आंदोलनाचे बंड पुकारले असून निरीक्षक अभिजित बोरोडे ला तात्काळ निलंबीत करा व मालाड पश्चिम रातोडीगाव येथील नीलिमा को ऑप सोसायटी मधील दुकान क्रमांक ४२ ग १९४ याचा परवाना रद्द करावा अन्यथा लॉकडाऊन च्या पार्श्वभूमी मुळे रस्त्याची लढाई धरणे आंदोलन करता येत नसल्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने वाघमारे हे आपल्या घरातच दिनांक 1 मे रोजी एक दिवशीय अन्न त्याग आंदोलन करणार असून जर हे करूनही कारवाई न झाल्यास घरातच बेमुदत अन्न त्याग आंदोलन करणार असून जर माझ्या जीवाचं बर वाईट झाल्यास उदभणाऱ्या परिस्थितीस मुख्यसमंत्री जबाबदार असतील असा निर्वाणीचा इशारा सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे.