Home विदर्भ कोरा येथे महाराष्ट्र बँकेत ग्राहकांची गर्दी.!

कोरा येथे महाराष्ट्र बँकेत ग्राहकांची गर्दी.!

77
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

सोशल डिस्टटिंगचा फज्जा : बँकेकडून ग्राहकांच्या सोईचा अभाव.

वर्धा – जिल्ह्यातील कोरा येथील महाराष्ट्र बॅंकेत शोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असल्याची प्रचिती ग्राहकांच्या गर्दीमुळे येत आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.बँकेत व्यवहारासाठी येजा करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेकडून कुठलेही सुविधा उपलब्ध करून दिल्या गेली नसल्याने बँक अधिकाऱ्यांचा अलगर्जीपणा पुढे आला आहे.
या बँकेत रोज शेकडो नागरिक व्यवहार करण्यासाठी ये जा करतात.सध्या उन्हाचा तडाखा असल्याने तासनतास रांगेत ताटवडत उभे रहावे लागत आहे. शिवाय या बँकेकडून साधे शानीट्रायजर ठेवण्यात आले नसल्याने येथील अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची प्रचिती येत आहे
ग्राहकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती असली तरी कुणालाही या गोष्टीचा सुचोवात दिसत नाही शिवाय गावात गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
या बँकेतील कर्मचाऱ्यांना गावातच राहण्याचे आदेश असतांना बँक अधिकारी कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यातून रोज येजा करतात.
त्यामुळे या बँक कर्मचाऱ्यांची खबरदारी घेण्याची गरज आहे.
या गंभीरबाबीकडे संबंधित कोरोना प्रतिबंध पथकाचे दुर्लक्ष आहे.
सामान्य माणूस रस्त्यावर दिसला तरी त्याला मारहान होतांना दिसते.
मात्र या बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचा फज्जा उडविला असल्याने पोलीस प्रशासन कारवाईचे पाऊल का उचलत नाही असा सवाल सामान्य नागरिक करीत आहे या गंभीर प्रकाराकडे वरीष्टांनी लक्ष देण्याची गरज आहे

Unlimited Reseller Hosting