Home मराठवाडा डिपो जळाल्यामुळे एकाच विहिरीवर शेकडो माणसे आणि जनावरांची पाणी पिण्यासाठी गर्दी….!

डिपो जळाल्यामुळे एकाच विहिरीवर शेकडो माणसे आणि जनावरांची पाणी पिण्यासाठी गर्दी….!

166

सोशल डिस्टन्ससिंगला महावितरणचा हरताळ

परभणी / गंगाखेड- गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथिल भोगलवाडी शिवारातील सुमारे 20 ते 25 बोअर व विहीरीवर विद्युत पुरवठा असलेला डीपी जळाल्यामुळे शेजारच्या एकाच विहीरवर परिसरातील शेकडो माणसे आणि जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी होत आहे. कोरोना सारख्या महामारी च्या काळात महावितरण मुळे सोशल डिस्टसिगला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पडेगाव येथील भोगलवाडी शिवारातील *लक्ष्मण डीपी* या नावाचा डीपी मागील पंधरा दिवसापूर्वी जळाला. परिसरातील शेतकऱ्यांनी गंगाखेड येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून नवा डीपी देण्याची मागणी केली. महावितरण चे अधिकारी श्री ढोणे साहेब यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे शेतकऱ्यांनी आपण भरलेली वीज देयके एकत्र जमा करून ती फाईल गंगाखेड कार्यालयामार्फत परभणी महावितरण कडे जमा केली. फाईल जमा करून दहा दिवस उलटूनही आज पाहतो महावितरणकडून नवीन डीपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पर्यायाने या डीपी वर चालणारे सुमारे वीस बोअर व विहिरीवरील अवलंबून असलेली माणसे व जनावरे मात्र शेजारच्या एकाच विहीरीवर पाणी पिण्यासाठी गर्दी करत आहेत. कोरोनासारखी महामारी सुरू असताना एकाच ठिकाणी माणसे जमू न देणं या नियमाला महावितरणकडून हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. एकूणच या घटनेमुळे या परिसरात कोरोना पसरल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न या शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ही बाब गावचे कार्यकर्ते सखाराम बोबडे यांच्याकडे कानावर घालताच त्यांनी संबंधित डेपोची माहिती जिल्हाधिकारी मा. दीपक मुगळीकर यांना व्हाट्सअप द्वारे कळवली. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयाची माहिती घेऊन तात्काळ विषय सोडविण्याचे आश्वासन बोबडे यांना दिले .