Home विदर्भ लाॅकडाउनच्या काळात देवळी पोलीसांनी पाच लाख 24 हजारांचा मुद्देमालासह दारुसाठा केला जप्त.!

लाॅकडाउनच्या काळात देवळी पोलीसांनी पाच लाख 24 हजारांचा मुद्देमालासह दारुसाठा केला जप्त.!

659

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

देवळी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी.

वर्धा – जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत कोरोणा संचारबंदी काळात काल सहा एप्रिलला राञी पावणे बारा वाजताच्या सुमारास पेट्रोंलीग बदोबस्तात पोलीस कर्मचारी व्यस्त असंताना देवळी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुरेश मडावी, मनोज नांदुरकर, धम्मानंद मुन, पोलीस वाहन चालक मंगेश येळणे यांच्या पथकाने वर्धा रस्त्यावर ज्योती धाब्यजवळ संशयित वाहन नाकाबंदी करून थांबवून तपासणी केली असता गाडी क्रमांक एम. एच.32 A.H. 5016 असलेल्या कार मधे विदेशी दारूने भरलेला साठा आढळून आला.
यात पाच खरड्याच्या खोक्यात 120 बिअरच्या बाटला अंदाजे किमंत 24 हजार रूपये किंमतीचा माल आढळून आला. सोबतच पाच लाख रूपये किंमतीची गाडी व मालाची किमंत असा एकुण पाच लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देवळी पोलीसांकडून जप्त करण्यात आला.
यातील तिन आरोपी संकेत कोराम , अंकीत गिरी पराग चौधरी राहणार वर्धा यांना ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.लाॅकडाउनच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुसाठा पकडल्यामुळे देवळी पोलीसांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.