Home मराठवाडा मुखेड शहरातील घनकचरा व्यवस्थापकाचे टेंडर रद्द करा , नगरसेविका सौ. सुरेखाताई लोहबंदे

मुखेड शहरातील घनकचरा व्यवस्थापकाचे टेंडर रद्द करा , नगरसेविका सौ. सुरेखाताई लोहबंदे

305

नांदेड , दि.२१ :- ( राजेश भांगे ) –

“शहरातील अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारास निमंत्रण.”

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची कामे गेल्या सहा ते सात महिन्यापासुन व्यवस्थित होत नसल्यामुळे सदरील संस्थेचे घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर रद्द करण्याची मागणी प्रभाग क्र.१ च्या नगरसेविका सौ. रेखाताई दिपक लोहबंंदे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले की, शहरातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या फुलेनगर चा परीसर प्रभाग क्र.१ मध्ये समाविष्ट आहे. या भागातील नाल्या सुव्यवस्थित नसल्यामुळे येथील नालेसफाई वेळोवेळी काढणे अत्यंत गरजेचे आहे. हा ठेकेदार शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कुचकामी यंत्रणा वापरून थातुर मातूर काम करुन केवळ पैशावर डल्ला मारत आहे. जणु की एकप्रकारे शासनाच्या तिजोरी वरच डल्ला मारत आहे. शहरात नाले साफसफाई साठी नगर परीषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारीच हे काम करतात व घनकचरा व्यवस्थापनाचे कोणीही कामगार नाले साफ सफाई साठी पुरविण्यात येत नाहीत. गेल्या सहा ते सात महीन्यापासुन शहरातील वेगवेगळ्या प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी कसलीच यंत्रणा कार्यरत नाही. नाल्या तुडुंब भरल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे परीणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. अनेक ठिकाणी स्वतः नागरीकच नाले साफ सफाई करुन कचरा उचलताना अनेकांच्या निदर्शनास आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा ठेकेदार हा केवळ बिल उचलण्यासाठीच महिन्यातुन एकदा मुखेड नगर परिषदेला येतो त्यामुळे संपुर्ण महिना शहरात स्वच्छतेचे तिन तेरा वाजले आहे, आज मुखेड शहरातील प्रभागाची पाहणी केली असता सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्रदुषण पसरल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जसेकी संंसर्गजन्य आजाराला आमंत्रणच. घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराची गेल्या सहा ते सात महिन्यापासुन होत असलेल्या बोगस कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व त्या संस्थेवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. मागील कालावधीत शहरातील स्वच्छता, साफ सफाई न करताच बिले उचलुन पैसे हडप करणा-या संस्थेवर कठोर कार्यवाही करावी, व नपा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित घनकचरा ठेकेदाराच्या स्वच्छता व्यवस्थापनाचा ठेका तात्काळ रद्द करून सदरील संस्थेविरूध्द सक्षम कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदनात नमुद केले आहे. याअगोदर सुध्दा एका नगरसेविकेने स्वच्छता ठेकेदारा विरुध्द आंदोलनाचा ईशारा दिला होता. तरी आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
शहरात स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचे ठेका लिलाव पध्दतीने महात्मा फुले एम. एस. एस. आष्टी ता. हदगाव जि. नांदेड या संस्थेस एका वर्षापुर्वी देण्यात आला आहे. सदरील संस्थेला नगर परीषद हिमायतनगर येथील टेंडर पध्दतीने घनकचरा व्यवस्थापनाचे काम देण्यात आले होते. परंतु अशाच प्रकारच्या बोगस कामामुळे तेथील संस्थेचे टेंडर रद्द करण्यात आले आहे असे समजते.