March 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना च्या प्रश्नावर यवतमाळ मनसे सरसावली…..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने १०,००० मास्क,हॅडवाॅश,साबनांचे वाटप

यवतमाळ , दि. २१ :- आजच्या महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना वायरसच्या दहशतीमुळे तसेच कोरोना वायरस संसर्गापासुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मनसेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हा मनसे तर्फे

जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहरातील बसस्थानका सह जिल्हातील विविध तालुक्यात सर्वसामान्य जनतेसाठी १०,००० मास्क , साबण , हँडवॉशचे मोफत वाटप करण्यात आले.या नंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मा.पोलीस अधिक्षक एम राजकुमार,मा.निवासी जिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे,न. प.मुख्याधिकारी मोहन नंदा साहेब सा. बा. विभाग कार्यकारी अभियंता मरपल्लीकर यासह शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्यांसाठी मास्क , हँडवॉश , सॅनेटायझर , साबण अश्या स्वरूपाची एक किट भेट म्हणून देण्यात आली.याप्रसंगी मनसेने तर्फे आवाहन करण्यात आले कि,जनतेने एकमेकांच्या संपर्कात न येता,गर्दी आणि प्रवास टाळण्याचं तसेच कोरोनाबाबत गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या जनतेला दिलासा देऊन त्यांना योग्य ती माहिती पुरविण्याचे तसेच सोयींची कमतरता असेल तर योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन मनसेने कार्यकर्त्यांना केले.या प्रसंगी मनसेने जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच निवासी जिल्हाधिकारी यांना शहरात मास्क आणि सॅनेटायझर चा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती दिली.यावर लवकरच धाडसत्र राबवू अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.आजच्या या मास्क वाटप शिबिरात मोठ्या प्रमाणात प्रवाशी,परिवहन महामंडळाचे कर्मचारी,रिक्षा चालक,अपंग नागरिक,व्यावसायिका यांनी लाभ घेतला.

यापुढे शहरातील विविध भागात तसेच चौकात मास्क,साबण,हँडवॉशचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अनिल हमदापुरे यांनी दिली.सोबतच यवतमाळकर जनतेच्या पाठीशी मनसे खंबीरपणे राहणार असून जनतेने घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे,अमित बदनोरे,सुकांत वंजारी संगिता घोडमारे,माधुरी ठाकरे,छबु आठवले,किशोर कुळसंगे,विनोद दोंदल,संदिप भिसे,गणेश खताडे,पिंन्टु पिंपळकर,सौरभ पत्रकार,प्रविण पिंपळकर,शिवा पुरी,रिषभ आठवले,विनय तामणे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!