Home यवतमाळ घाटंजीत बियाणे कंपनीच्या प्रतिनिधिचा शेतकऱ्यांसाठी महाप्रसाद

घाटंजीत बियाणे कंपनीच्या प्रतिनिधिचा शेतकऱ्यांसाठी महाप्रसाद

29
खरिपात शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नासाठी साकडे 
————————————–
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – खरिपाच्या लागवडीची वेळ आली आहे. जून महिना सुरू झाला असून मृग नक्षत्रा अगोदर सार्वत्रिक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी शेतात कपाशीची लागवड अजून सुरू केली नाही. परंतु आता मृग नक्षत्र तोंडावर आले आहे आतापर्यंत पाऊस खंडीत स्वरूपात अल्प प्रमाणात पडत आहे शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस जवळ आले आहे. यामुळे शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे. तेव्हा पाऊस पडला असता तर पिके डौलदार उभी राहिली असती .तेव्हा यावर्षी खरिपात चांगले उत्पादन यावे यासाठी तालुक्यात अनेक बियाणे व औषध व रासायनिक खते कंपनीचे प्रतीनीधी आहेत.त्यांनी गुरुवार दि.४ जून रोजी येथील स्थानिक खापरी नाका येथिल शिवमंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून भरपूर पाऊस पडू व बळीराजाला भरभरून उत्पन्न येऊ दे यासाठी शिवमंदिरात विधिवत पुजा करून उपस्थित शेतकरी व नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हा महाप्रसाद करून साकडे घातले आहे. तेव्हा वरूणराजा प्रसन्न व्हावा यासाठी कंपनी प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी प्रार्थना केली.
अन्नदात्याचा भरवस्यावर सर्व उलाढाली आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी दरवर्षी या बियाणे औषधी व रासायनिक खते कंपनी प्रतीनीधी कडून हा उपक्रम मागील काही वर्षांपासून खरिप हंगामाच्या सुरवातीला राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून बळीराजाचे ऋण फेडण्याचा हा छोटा प्रयत्न असल्याचे कंपणी प्रतीनीधी कडून बोलले जात आहे.या उपक्रमावर वरूणराजा प्रसन्न होऊ दे व बळीराजाला भरघोस उत्पादन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शहरातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते व बियाणे औषधी व रासायनिक खते कंपन्याचे प्रतीनीधी व तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनंता नखाते, धनंजय भोरे, नागनाथ लोखंडे, रविंद्र अहिरकर,अनील सावरगावकर, ठकसेन लोखंडे, विठ्ठल घरत,गणेश राठोड ,अनील रामटेके, अक्षय मुनगिनवार,चेतन डंभारे, संतोष बरबटकर, धनंजय घाटोळ, रोहित निलावार , नरेश दासरवार, सारंग वानखडे, विवेक घोडे, सागर कोलपवार, प्रविण पिंपळकर , जानराव आडे, संगम सुड्डेवार, रोशन घागी, धनंजय वाघ , राम बुरेवार, ज्ञानेश्वर ढगे, मकरंद इंगोले ,सतिष वानखडे, शेषराव गावंडे, अथर्व भोयर , तेजस अंबेकर,आकाश ठाकरे, छगन ठावरी , शुभंम खंगन, शुभंम ताजणे, अजय खोंडे, प्रशांत भोयर, हिमांशु चौधरी, नचिकेत चवरडोल, मिथुन चव्हाण,शुभम ताजणे,चंद्रशेखर संगनवार, विलास आडे,प्रदिप जाधव, विजय भोयर, तुषार घोडमारे,सुरज ठाकरे सह अन्य यांनी अथक परिश्रम घेतले.