Home यवतमाळ पोहायला गेलेल्या पिता -पुत्राचा विहिरीत मृत्यू….

पोहायला गेलेल्या पिता -पुत्राचा विहिरीत मृत्यू….

191
रामनगर घोटीची घटना, गावावर शोककळा..
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामनगर तांडा येथिल शेतीव्यवसाय करणारा सचिन प्रेमसिंग जाधव वय ३७ वर्षे व त्याचा नऊ वर्षीय मुलगा विहान सचिन जाधव दिनांक २८ मे गुरुवारच्या दुपारदरम्यान गावालगत असलेल्या विहिरीवर पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावणारी हृदयद्रावक घटना घडली.
मृतक सचिन जाधव हा शेतीचा व्यवसाय करीत होता. अश्यातच पाच ते सहा वर्षांपासून दारूचे व्यसन जडल्याचे जबानी रिपोर्ट मध्ये नमूद असून त्याला पाण्यात पोहणे अवगत असल्याचेही नमूद केले आहे. मात्र खोलवर विहिरीत नऊ वर्षीय मुलगा विहान ला पाठीवर बसण्यास लावले असावे यात त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटून ते खोलवर पाण्यात गेल्याने काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. ही बाब त्यांचे नात्याने होणारे चुलत भाऊ सुभाष बळीराम जाधव वय ४० वर्षे यांना त्यांच्या मुलाने घटनेची माहिती फोन वरून दिल्याने त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर त्याठिकाणी स्थानिकांची गर्दी जमली होती. याबाबत पारवा पोलीस स्टेशनला जाऊन सुभाष जाधव यांनी जबानी रिपोर्ट दिला. त्यावरून पारवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून शव वर काढले व उत्तरिय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. सदर घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात घोटी बिटचे ए.एस.आय.संदीप महाजन व पारवा पोलीस करीत आहे. या दुर्दैवी घटनेने घोटी परिसरात शोककळा पसरली असून पिता पुत्राच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.