Home वाशिम आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास जन्मठेप

आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास जन्मठेप

184

 

फुलचंद भगत
वाशिम:-वाशीम पोलीस दल नेहमीच महिला सुरक्षेच्या संदर्भाने संवेदनशील भूमिका घेत असतो मा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे साहेब, अपर पोलीस अधिक्षक मा.लता फड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली महिला सुरक्षा गांभीर्याने घेतली जाते.
दि.1 जुन 2024 रोजी वाशीम शहर येथील पंचशील नगर येथील एक चिमूरडी आई वडिलांसह शेजारी हळदीच्या कार्यक्रमास गेली असताना विकृत 27 वर्षीय विजय उर्फ भोलाराम बरखम रा पंचशील नगर याने संधीचा फायदा घेत सदर बालिकेचे अपहरण करून स्वतः च्या घरात तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची माहीती वाशीम शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी जावुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ बालीकेची वैद्यकीय तपासणी करून पिडित बलिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूध्द अप क्र. ३४/२०२४ कलम 376(AB), 307,363 भा दं वी सह कलम ४,६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करून, पो निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी तपास करून तात्काळ आरोपीस अटक केले तपास शास्त्रशुध्द पध्दतीने करत विविध पुरावे गोळा करून तपास 6 दिवसात पूर्ण करून 28 व्या दिवशी दोषारोप पत्र मा न्यायालयात दाखल केले होते.याप्रकरणी येथील वि.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विजय उर्फ भोलाराम बरखम यांची अंडर ट्रायल केस जलदगतीने चालवून सरकारी पक्षाने पीडिता, साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक अहवाल तपासी अधिकारी यांचे पुरावे तपासून आरोपीवरील दोषारोप सिध्द झाल्याने मा जिल्हा व सत्र न्यायालय 3 यांनी कलम ६ पोक्सो च्या गुन्ह्यात आजन्म कारावास आणि २०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास) कलम ३६३ च्या गुन्ह्यात ५ वर्षे कारावास आणि ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिने साधा कारावास), अशी शिक्षा सुनावली आहे.
या शिक्षेमुळे समाजात एक सुरक्षिततेचि भावना व न्यायमंदिर व पोलिसांप्रति सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे सदर निर्णया मुळे पीडित बालिकेला न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया जनमानसात चर्चेत आहे या खटल्यात सहाय्यक अभियोक्ता एम. टी. मिसर मॅडम यांनी सरकारी पक्षाचे काम पाहिले. तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील (सध्या ठाणेदार वाशीम ग्रामीण) मदतनीस PC योगेश इंगोले तर PC सतीष बांगर यांनी कोर्ट पैरवीचे काम पाहिले. तपासाची प्रक्रिया वाशिम पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

महिला आयोगाने या प्रकरणाची विशेष दखल घेतली असून पो अधीक्षक तारे साहेब व तपासिक अधिकारी सपोनि श्रीदेवी पाटील यांचे फोनद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.