
फुलचंद भगत
वाशिम:-सध्या शासनातर्फे अंमली पदार्थ विरोधात सक्त कारवाई करण्याविषयी धोरण असून पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयात अमली पदार्थ जसे मेफॅडोन, गांजा व तत्सम पदार्थ विरोधात धडक कारवाई सूरू केलेली आहे व ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने दिनांक ६.१०.२०२५ रोजी स्था. गू.शा. वाशिम यांना खब या मार्फत माहीती मिळाली कि सायंकाळी दरम्यान कारंजा शहर बस स्टॅन्ड परीसरात बाहेर राज्यातून आणलेला गांजा विक्रीस येणार आहे. त्यानूसार स्था. गू. शा. वाशिम यांनी कारंजा टि पॉईंट बसस्टॅन्ड भागात पो. स्टॉप व पंचासह जावून कायदेशीर प्रक्रियेचा आवलंब व पूर्तता करून सापळा लावला होता. काही वेळानंतर मिळालेल्या माहीती प्रमाणे कारंजा शहरातील बस स्टॅन्ड कडून एक संशयीत इसम हा त्याचे पाठीवर बॅग व एक थैली हातात अशा अवस्थेत येतांना दिसून आला त्यास पो. स्टॉफचे मदतीने थांबवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव निलेश सुभाष गायकवाड वय ३६ रा. निफाड जि. नाशिक ह .मू. पंचशिल नगर वाशिम असे सांगीतले पंचासमक्ष त्याची व त्याचे जवळील बॅग व थैलीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण १० किलो गांजा सदृष्य माल किंमत १०,००,०० लाख कारंजा रूपयचा मिळून आला सदर आरोपी व मिळालेला माल ताब्यात घेवून नमूद आरोपी विरूध्द पो.स्टे. वारिस शहर येथे कलम ८क २०ब एन. डी. पी. एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी,सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोहेकॉ गजानन झगरे, पोना ज्ञानदेव मात्रे, पोना गजानन गोटे, पोका दिपक घूगे, पोकॉ अमोल ईरतकर,पोकॉ संदिप दूतोंडे, पोका तूषार ठाकरे, चालक संदिप डाखोरे, सुनील तायडे सर्व नेमणूक स्था. गू. शा वाशिम यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.











































