Home वाशिम आगामी निवडणुकीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा,वाशिम ची शस्त्र अधिनीयम अन्वये कारवाई

आगामी निवडणुकीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा,वाशिम ची शस्त्र अधिनीयम अन्वये कारवाई

129

 

फुलचंद भगत
वाशिम:- पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या पासुन अनेक उपक्रम हाती घेतले. तसेच आगामी नगर पालीका, जिल्हा परीषद निवडणुकीचे अनुषंगाने निवडणुक शांतता प्रिय व निविघ्नपणे पार पाडणे करीता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्या करीता अवैद्य दारु, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना वचक निर्माण केली आहे.
पोलीस अधीक्षक अनुज तारे, यांचे आदेशानुसार वाशिम जिल्हा मध्ये आगामी काळात निवडणुका पार पडणार असुन निवडणुकीचे काळामध्ये शांतता अबाधीत राहावी या दुष्टीने शस्त्र अधिनियम च्या कारवाही करण्या करीता आदेश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 07/010/2025 रोजी शेख सममान शेख फईम वय 25 वर्ष रा. झाकलवाडी ता. वाशिम जि वाशिम हा त्याचे राहते घरामध्ये तलवार बाळगुन असल्या बाबत गुप्तमाहीती मिळाल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या टिम ने सदर आरोपीचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी तलवार मिळुन आली. त्यावरुन सदर इसमाविरुध्द पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही मुळे गुन्हेगारा मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक लता फड याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी, पोउपनी शेखर मास्कर, पोहवा गजानन अवगळे,सुरज खडके,आशिष बिडवे, पोना दिलीप देवकते, पोअंम भुषण ठाकरे, महीला पोहवा सुषमा तोडकर पो चालक पो अंमलदार सुनिल तायडे यांनी केली.