
उर्सात रसिकांनी मनसोक्त लुटला कव्वालीच्या मैफलीचा आनंद ……………………………..
बुलडाणा ………….प्रतिनिधी
अल्लाह तआलाने स्वतःला पवित्र कुरआनात रब्बूल मुस्लिमीन नाही रब्बूल आलमीन असं संबोधलं. रब्बूल आलमीन अर्थात संपूर्ण सृष्टीचा कर्ताधर्ता.फक्त मुसलमानांचाच नाही तर हिंदुचाही .त्याच धर्तीवर सरकारे दो आलम हजरत मोहम्मद सलल्लाहो
अलैहवसल्लम यांचाही उल्लेख अल्लाहने पवित्र कुरआनात
रहेमतुल आलमीन असा केला आहे. रहेमतुल आलमीन म्हणजे संपूर्ण मानवजातीवर कृपावर्षाव करणारे. इस्लामधर्मीय सुफिंनी आणि हिंदूधर्मातील वारकरी सांप्रदायातील संतांनी धर्माच्या भिंती ओलांडून माणूसकीची जडणघडण केली. सुफीसंतांच्या समष्टीपूर्ण रचनांनी आणि समरसतेच्या सम्यक विचारांनी पिढ्यानपिढ्या मनाची आणि मेंदूची मशागत झाली.त्यांनीच मनामनात पेरली बंधुभावाची डोळस बीजे असे सर्वसमावेशक प्रतिपादन बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष .गजानन संतोषराव वायाळ यांनी केले. ते मेरा खुर्द येथे 4 सप्टेंबर रोजी गौसूल आजम,पिराने पीर,दस्तगीर हजरत अब्दुल कादिर जिलानी रहेमतुल्लाह अलैह यांच्या उर्स शरीफनिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कव्वाल हाजी अब्दुल लतीफ हैरां यांच्या कव्वालीच्या मैफलीच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.दुपारी दोन वाजता सजवलेल्या घोड्यावरून संदलची भव्यदिव्य मिरवणूक परंपरागतपद्धतीने मुजावर रऊफशाह यांच्या घरून निघाली. गौसे आजम यांच्या पवित्र नावाचा जयघोष करत वाजतगाजत सरकार गौसे आजम यांच्या चष्मये इनायत,मकामे मुये मुबारक येथे जल्लोषात पोहोचली.सर्वजातीधर्माच्या भाविकांच्या उपस्थितीत आणि बाबरभाई देशमुख आणि बुलडाणा जिल्हा रा कॉ सचिव नदीम अहेमद देशमुख यांच्या नेतृत्वात चादरेगुल आणि संदल सश्रद्धपणे मकामे मुये मुबारकवर अर्पित करण्यात आले.फातेख्वानीनंतर तबररूक अर्थात महाप्रसादाचे भाविकांना वितरण झाले. रात्री ठिक 8 वाजता प्रख्यात मराठी कवी,नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या भरजरी उर्दू आणि तालेवार मराठीतल्या सुश्राव्य सूत्रसंचालनाखाली हाजी अब्दुल लतीफ हेरां कव्वाल यांच्या कव्वालीच्या मैफलीला सुरुवात झाली.कव्वालीच्या मैफलीच्या उदघाटनप्रसंगी बुलडाणा जिल्हा रा कॉ उपाध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ, माजी जि प सदस्य अशोकराव पडघान, बुलडाणा जिल्हा अल इकरा तालिमी,सकाफती तंजिमचे संस्थापक अध्यक्ष सगीरसेठ हाजी शेख बशीर,सचिव रफीकभाई,
जिल्हा ओ बी सी सेल अध्यक्ष सुभाष देव्हडे,महाराष्ट्र प्रदेश रा कॉ सरचिटणीस बि टी जाधव, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम खेडेकर, प्रदेश रा कॉ सरचिटणीस शंतनू बोन्द्रे, तालुका शिवसेना उपप्रमुख बाळू वराडे, सुधाकर देशमुख, सर्जेराव गवई, दिपक शिंगणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार बाबारभाई देशमुख,नदीम अहेमद देशमुख,असलम शेख,इम्रान खान,जमिल शेख, जुनेद सौदागर यांनी केला.बुलडाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी आणि रसिकश्रोत्यांनी कव्वालीच्या मैफलीचा आनंद मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त लुटला . सरकारे दोआलम यांच्या दरबारात सलाम पेश करून हाजी अब्दुल लतीफ हैरां यांनी कव्वालीच्या मैफलीची यशस्वी सांगता केली.उपस्थितांचे आभार जिल्हा रा कॉ सचिव नदीम अहेमद देशमुख यांनी मानले……………………………..












































