Home बुलडाणा साखरखेर्डा येथे ईद मिलाद उन नबी च्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर सम्पन्न...

साखरखेर्डा येथे ईद मिलाद उन नबी च्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर सम्पन्न ,

489

 

 

हिन्दू मुस्लिम बांधवाचा सहभाग ,

अमिन शाह

साखरखेर्डा
येथे ईद मिलाद उन नबी च्या पावन परवावर खिदमते ऐ खल्क फाउंडेशन च्या वतीने भव्य रकतदान शिबिर आयोजित करण्यात आला होता या रक्तदान शिबिरात 185 रक्तदात्यानी रक्तदान केले ,

साखरखेर्डा येथे ईद मिलाद उन नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकी नंतर शुक्रवार ची नमाज अदा केल्यानंतर ऐतेहासिक जामा मस्जिदमध्ये प्रथमच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १८५ हिन्दू मुस्लिम रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात ठाणेदार गजानन करेवाड, सरपंच पति अमित जाधव, डॉ. गणेश देशमुख, विशाल गवई, श्याम खरात, सिध्दार्थ बेंदाडे, खिदमत खल्क फाउंडेशनचे अध्यक्ष मो समीउलहक, आबीद पठाण, शे राजीक, सिकंदर पठाण, जुबेर पठाण, अब्दुल रशीद, शे अर्शद, शेख वसीम , शेख तौसीफ कुरेशी ,निसार शाह , आसिफ शाह शेख शाहरुख , या पदअधिकारयांसह १८५ हिन्दू मुस्लिम बाँधवांनी रक्तदान केले. यावेळी माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी सरपंच महेंद्र पाटील, युवासेना नेते योगेश जाधव, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव,भाजपा चे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे , अंकुर देशपांडे माजी सरपंच कमलाकर गवई , मेजर अर्जुन गवई , माजी उपसरपंच सय्यद रफीक, अयुबसेठ कुरेशी , इब्राहिम शाह , शेख रफीक प्यारे यांच्या सह सर्व हिन्दू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
या वेळी सर्व रक्तदान करणाऱ्यात मोठा उत्साह दिसून आला यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना खिदमत ऐ खल्क फाउंडेशन च्या वतीने फळाचे वाटप करण्यात आले
रक्त संकल केंद्र वाशिम आणि जालना येथील रक्त पेढीच्या टीम ने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाण पत्राचे ही वाटप करण्यात आले अर्शी माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष मो , समीउल हक यांनी दिली आहे ,