
देगलूर/प्रतिनिधी
भावंडांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा धागा असलेला रक्षाबंधन हा सण देगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीच्या कार्यालयात अविस्मरणीय वातावरणात साजरा झाला. या खास क्षणी सहकारी पत्रकार श्वेता चिदलमवाड यांनी पत्रकार बांधवांच्या हातावर राखी बांधत स्नेह, ऐक्य आणि परस्पर जिव्हाळ्याचा सुंदर संदेश दिला.

राखीच्या धाग्यात गुंफलेला स्नेह आणि नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडून गेली. हा केवळ सण नव्हता, तर पत्रकार बांधवांच्या नात्याला बळकटी देणारा हृदयस्पर्शी सोहळा होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस देगलूर टाइम्सच्या वतीने श्वेता चिदमलवाड यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या क्षणी वातावरणात आनंद, कृतज्ञता आणि परस्पर विश्वासाची नवी ऊर्जा पसरली.
या वेळी समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव तथा ज्येष्ठ संपादक गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सहकार्याध्यक्ष धनाजी जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होते.











































