Home नागपूर भाजी विक्रेतास लुटणारे गजाआड -प्रतापनगर पोलिसांची कामगिरी

भाजी विक्रेतास लुटणारे गजाआड -प्रतापनगर पोलिसांची कामगिरी

288

नागपूर,  – ( डॉ आशिष अटलोए -जिल्हा प्रतिनिधी )

दिवसभर भाजी विकून आलेला पैसा उशीखाली ठेवला आणि दुकानदार महिला झोपी गेली. पण काही वेळानंतर तीच पैशाची पिशवी दोन आरोपींनी बळजबरीने हिसकावून नेली. याप्रकरणातील दोन्ही आरोपींना प्रतापनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना जयताळा मार्गावरील बाजार चौकात २२ जुलै रोजी घडली होती. नवीनादेवी परमानंद वर्मा असे फिर्यादी भाजी विक्रेता महिलेचे नाव आहे.घटनेच्या दिवशी नवीनादेवी वर्मा यांनी दिवसभर भाजी विकल्यानंतर आलेला पैसा गोळा केला. तो मोजला असता ती रक्कम ७ हजार रुपये होते. ती रक्कम त्यांनी एका पिशवीत टाकून ती उशीखाली ठेवली. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास नवीनादेवी वर्मा तिथेच झोपी गेल्या. पण काही वेळानंतर अज्ञात आरोपींनी उशीखाली ठेवलेली ती पैशाची पिशवी बळजबरीने काढली आणि त्यांनी तेथून काढता पाय घेतला हालचाल झाल्याने नवीनादेवी वर्मा यांना जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता दोन आरोपी जयताळा दिशेने जात होते. तेव्हा त्यांनी उशाखाली ठेवलेली पैशाची पिशवी पाहिली असता ती दिसली नाही. यामुळे नक्कीच चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले व वेळ न दवडता तातडीने त्यांनी याविषयी प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रतापनगरचे ठाणेदार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी याविषयी भारतीय न्याय संहिता कलम 3 8(P) * 3(4) अन्वये गुन्हा दाखल केला. घटना आव्हानात्मक असल्याने तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज बोंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल तांबे, पोलिस उपनिरीक्षक सतीश भोले, एकनाथ पाटील, दिनेश भोगे, विशेषकुमार, अंकुश कनोजिया, अजय धुर्वे, प्रवीण मसराम, अलेक्स
डिक्रुज, आनंद काबलिया, सचिन तिवारी यांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपी सागर नरेंद्र तिवारी, पवन महेंद्र तिवारी यांना अटक केली. आरोपींकडून रोख ११५०० रुपये आणि वाहन असा माल जप्त करण्यातही यश मिळवले. काही दिवसातच प्रतापनगर पोलिसांनी भाजी विक्रेत्याकडे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.