Home विदर्भ महसूल सप्ताह अंतर्गत पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड

महसूल सप्ताह अंतर्गत पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड

216

ब्रह्मपुरी /प्रतिनिधी

चंद्रपूर – महसूल सप्ताह अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, मेंडकी, आवळगाव चौगाण ,अरे-हेर ब्रह्मपुरी, पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ब्रह्मपुरीच्या, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, नायक तहसीलदार लीना किशोर बोभाटे, मंडळ अधिकारी पुरुषोत्तम कावळे, तलाठी बहाकरे, महेश कोहळे, सरपंच विवेक बनकर ,व कोतवाल अंकुश ठवकर, ग्रामपंचायत सदस्य शेतकरी बंधू उपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पतेतुन १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहाचा एक भाग आहे सर्व पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोहीम स्वरूपात पाणंद रस्त्यालगत झाडे लावण्याची कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.