Home यवतमाळ पांढरकवडा नगर परिषद भ्रष्टाचार प्रकरण, पुराव्यानिशी तक्रारी देऊनही सचिव,आयुक्त,जिल्हाधिकारी गप्प ? “व्हिसल...

पांढरकवडा नगर परिषद भ्रष्टाचार प्रकरण, पुराव्यानिशी तक्रारी देऊनही सचिव,आयुक्त,जिल्हाधिकारी गप्प ? “व्हिसल ब्लोअर रजनीकांत बोरेलेंच्या आरोपांनी खळबळ”

346

प्रतिनिधि :bपांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपरिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात व्हिसल ब्लोअर व सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी २३ एप्रिल २०२५ रोजी नगरविकास विभागाचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, यवतमाळ जिल्हाधिकारी आणि केळापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी गंभीर तक्रारी दाखल केल्या होत्या.
मात्र, अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नसून, नमूद अधिकारी,जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुण भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाटबळ देत असल्याचा गंभीर आरोप रजनीकांत बोरेले यांनी केला आहे.
या प्रकारामुळे पांढरकवडा नगरपरिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय मिळत असून, या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी,आयकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तातडीने चौकशी करण्याची मागणी रजनीकांत बोरेले यांनी तीव्र केली आहे.
बोरेले यांनी आपल्या तक्रारीत पांढरकवडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (ज्ञानेश्वर सोनवणे), पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य व लेखा विभागांचे प्रमुख यांनी संगनमताने पदाचा व अधिकारचा दुरुपयोग करत अनेक गैरप्रकार केल्याचे पुराव्यांसह नमूद केले आहे. यामध्ये प्रामुख्याने, पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना नियमबाह्य पद्धतीने, तब्बल ५४.४१ कोटी रुपयांचे कंत्राट ६.७८ टक्के जादा दराने देणे, जवळ पास सवर्च निविदा मध्ये तीनच विविदा असणे, बांधकामांचा निकृष्ट दर्जा, शेड्यूल बी नुसार गुणवत्ता नही.अति घाइने देयक अदा करने,विना रॉयल्टी आणि चोर्ट्या कडून घेतलीली वाळूचा बांधकामात वापर करून शासनाचा महसूल बुडवणे, आखाडा वॉर्डातील पाणी टाकीचे ९१.२७ लाख रुपयांचे कंत्राटही जादा दराने देणे आणि पाणीपुरवठा पाईप लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचे गंभीर आरोप आहेत.
याशिवाय, सहर स्वच्छता कंत्राट मागील 4 वर्षात कोट्यावधी रूपयांचा देण्यात आले आहे ते मैनेज करुण देण्यात आले आहे त्यातील आलेल्या निविदा मधील तीन निविदा धारकांना एक मेकांना स्पोर्ट म्हणून दाखविले आहे.स्वच्छता मजुरांची कामावरिल हजेरी कमी रहिल्यास त्या वेळी जास्त दाखविने, लेबर कायद्याच्या तरतूदी प्रमाण कमी मजूरी देने, जास्त वेळ कामे घेणे,भविष्य निर्वाह निधीत अनियमितता, तसेच कचरा डेपोला आग लागल्याची घटना संशयास्पद असून, कोणतीही एफआयआर न करता बायोमायनिंगची देयके काढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सचिव,आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, यांचे कळे सबळ पुरावे देऊनही ते लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि सीआयडी. विभाग कड़े रजनीकांत बोरेलेंची अनेक मुद्दयांची पाच पानी गंभीर तक्रार तपासा करीता वर्ग केली नाही.
याचा अर्थ वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा भरपूर लक्ष्मी दर्शन घेवून साष्टांग दंडवत केले असतील.. असा संतप्त देखील रजनीकांत बोरेले यांनी व्यक्त केला आहे.
वरिष्ट अधिकारी यांची गांधारी च्या भूमिका मुळे न. प. च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मनोबल वाढत असून, सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशांची उघड लूट सुरू आहे.
विशेष म्हणजे अनेक कामांचे लक्षावधी रुपये अग्रिम म्हणून काढण्यात आली असून कामांचे देयक अति घाइने अदा करण्यात आले असून न. प. च्या काही विभागात कागदोपात्री रेकॉर्ड देखील उपलब्ध नाही आहे
बोरेले यांनी असेही नमूद केले आहे की मुख्याधिकारी नव्याने सेवेत रुजू झाले आहे त्यांना आज पावेते मिळालेल्या वेतनाचे हिशेब करुण खर्चा जावून त्यांचे कढील नगदी शिल्लक,मालमत्ता किती आहे त्याची तापस करण्याची यावी आणि गैरव्यवहारात गेलेल्या निधीची वसुली करुण नगरपरिषदच्या तीजोरित जमा करावी व त्यांना सेवेतुन बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे होत असलेल्या अर्थ पूर्ण कथित दुर्लक्षामुळे नगरपरिषदाचे आणि राज्य शाशनाचे आर्थिक नुकसान झाले आहे करोड़ो रूपयांचे निवादा मुख्याधिकारी यांनी खारीज करुण पुन्हा निवादा काढली असती तर सर्व निविदा मध्ये स्पर्धा होवून 15 ते 20 टक्के निविदा बिलो (कमी ) दरा मध्ये जावून लक्षावधी रूपयाचा फायदा नगर परिषदेचा झाला असता असे शुद्धा तक्रार मध्ये नमूद केले आहे.
या शिवाय तक्रारीत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहे उपस्थित केलेल्या सर्व मुद्दयांची मुद्दे नियाई तापस सीआईडी,आयकर,लाच लुच प्रतिबंधक विभाग यांचे कडूनच करण्यात यावी अशी मागणी रजनीकांत बोरेले यांनी केली आहे हे विशेष