Home परभणी भगवती मंदिर, शिवाजी चौक, गंगाखेड येथे छत्रपती राजे मल्हारराव होळकर जयंती उत्साहात...

भगवती मंदिर, शिवाजी चौक, गंगाखेड येथे छत्रपती राजे मल्हारराव होळकर जयंती उत्साहात साजरी!

209

महापुरुष जयंती समितीचे संकल्पक श्री माधवराव चव्हाण व माजी सरपंच वाघलगाव श्री नारायणराव घनवटे यांच्या आयोजनाखाली गंगाखेड येथील भगवती मंदिर, शिवाजी चौक येथे छत्रपती राजे मल्हारराव होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सखारामजी बोबडे पडेगावकर, हरी माणिकराव जोशी, दिलीप दलाल, अंबादास कुलकर्णी, जगदीश नांदे, आलयार खान आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मल्हारराव होळकर यांच्या महान कार्यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला. श्री माधवराव चव्हाण यांनी मल्हारराव होळकर म्हणजे भारतमातेच्या संरक्षणासाठी मिळालेली अद्भुत देणगी म्हणून गौरवले, तर श्री सखारामजी बोबडे यांनी त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीवर सखोल विवेचन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नारायणरावजी घनवटे यांनी केले.