Home महत्वाची बातमी पोटच्या सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक ,

पोटच्या सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास अटक ,

310

अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला अन , नराधम पित्याचा कृत्य जगा समोर आला ,

अमीन शाह

शेगाव ,

नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षांपासून सुरू होतं
बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी नको म्हणत असतांनाही नराधम बापाने वारंवार मुलीच्या शरीराचे लचके तोडले आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला . मिळालेल्या माहिती नुसार या अत्याचार पीडित मुलीने एका गोंडस बाळास जन्म दिला असून या बाळाचा व त्याच्या आजाचा dna टेस्ट करण्यात आला असून dna रिपोर्ट नुसार तोच त्या बाळाचा बाप असल्याचे सिध्द झाले आहे पोलिसांनी त्यास नराधमास अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार अमोल बारापत्रे , पो , हे का , जावळे पो , का रविंद्र गायकवाड हे करीत असून पुढील तपास सुरू केला आहे ,