Home यवतमाळ रेमंड युको डेनिम तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर

रेमंड युको डेनिम तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर

170

यवतमाळ –  जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, तो काही प्रमाणात भरून निघावा व शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे व त्यांना वणवण भटकावे लागू नये, यासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी यांना सहकार्य करण्याच्या भावनेने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रा . लि. यवतमाळ आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन एम.आय.डी.सी.लोहारा यवतमाळ, येथे करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन श्री नितीन कुमार श्रीवास्तव सर यांनी केले तर मानव संसाधन विभाग वरिष्ठ प्रबंधक चंद्रशेखर पातुरकर ,संतोष चांडक , जयविर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत 125 रक्त दात्यांनी रक्तदान केले आणि या प्रसंगी या उपक्रमाला युवा वर्गाचा व लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या सामाजिक उपक्रमात युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी निस्वार्थ सेवा फाऊंडेशन चे प्रवीणभाऊ इंझाळकर, अनिकेत नवरे, अर्पित शेरेकर,किरण हेडाऊ, अनिकेत इंगोले, ईश्वर येरके, मयूर काळे, निलेश कळसकर, यांनी परिश्रम घेतले. शिबीर स्थळी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाची चमू , यांनी पूर्ण प्रक्रिया मोठ्या उत्साहाने सांभाळली.तसेच सदर शिबीराच्या यशस्विते करीता HDFC बँक यवतमाळ यांनी रक्त दात्यांचा उत्साह वाढविणे करीता भेट वस्तू देऊन विशेष सहकार्य केले.करीता निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांनी HDFC बँक यवतमाळ आणि रेमंड युको डेनिम प्रा. ली. यवतमाळ यांचे शतशा आभार व्यक्त केले.