Home यवतमाळ ताडसावळी नजीक घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी रेतीचा ट्रक्टर पकडला..!

ताडसावळी नजीक घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी रेतीचा ट्रक्टर पकडला..!

149

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी : घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी ताडसावळी येथे अवैध रेती वाहतूक करणारा प्रशांत शंकर बच्चुवार रा. ताडसावळी यांच्या मालकीचा विना क्रमांक असलेला ट्रॅक्टर एक ब्रास रेतीसह ताब्यात घेतला. तसेच पुढील कारवाई साठी सदरचा ट्रक्टर पारवा पोलीस स्टेशन ठाण्यात लावण्यात आला.

सदर कारवाई करते वेळी घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे, ताडसावळीचे तलाठी रामेश्वर कुमरे, कोतवाल ईस्तारी आपतवार, जिप चालक अभिजीत तिवारी इत्यादी उपस्थित होते.