
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगावराजा :-गेल्या अनेक वषार्पासून नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळेला डिजीटल व मॉडेल करण्यासाठी प्रयत्नशिल असलेले उर्दु माध्यमाचे शिक्षक प्रयत्न करीत होते परंतु काही अडचणी मुळे कामे कोळबंली होती. दि.१ आॅग्सट पासून न.प.उर्दु शाळेच्या मुख्यध्यपक पदी अ.हाई रुजु झाल्याने शिक्षक व कर्मचाºयां मध्ये नविन उर्जा निर्माण झाली आहे.
इतर खाजगी शाळांप्रमाणे आणि इंग्रजी शाळाप्रमांणेच आपलीही शाळा मॉडेल व्हावी असे अनेक शिक्षक, कर्मचाºयांना वाटते शिकायला येणारा प्रत्येक विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेऊन आपल्या शाहेचे नावलौकीक करून जीवनात यशस्वी व्हावा यासाठी शिक्षक धडपडत असतो. त्यासाठी स्वत: पासून सुरुवात केली तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. ही बाबा लक्षात घेत आज पासून मुख्यध्यापक पदाची जबाबदारी स्विकराता अब्दुल हाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येणाºया काळात न.प.उर्दु प्राथमिक शाळेला मॉडेल बनव्णियाचा संक्लप केला. त्यांना याप्रसंगी राजकीय, सामाजिक, संघटना आणि पत्रकारानी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जहिर खान पठान यांनी सत्कार केले. यावेळी काशीफ खान कोटकर, अन्नु माया, तौसीफ शेख, तौफीक शेख, समिर शेख, वाडेकर सर, गाडेकर सर, अलताफ खान कोटकर, जावेद खान, अशफाक टेलर, पत्रकार मुशीर खान कोटकर, अशरफ पटेल व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.











































