Home नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुंडलवाडी शाखेला पासबुक व एटी एम प्रिंटर...

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुंडलवाडी शाखेला पासबुक व एटी एम प्रिंटर उपलब्ध करुन द्या- वैभव घाटे

265

बिलोली प्रतिनिधी

कुंडलवाडी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे बँक खाते आहेत. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून विविध प्रकारचे शेती अनुदान मिळत असते तसेच शेतकरी पेन्शन देखील मिळत असते. सदरील सर्व अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असते. ग्रामीण भागातील शेतकरी हा बहुतांश अल्पशिक्षित व निरक्षर असल्यामुळे बँक व्यवस्थापनातील मंडळी शाखाव्यवस्थापका सह सर्व कर्मचारी शेतकऱ्यांना परिशान करित आहेत
शेतकऱ्यांचे खाते पिएम किसान सम्मान निधीचे पैसे या बँकेत जमा होतात आदी पैशाची उलाढाल मध्यवर्ती बँकेतून होत. मात्र सद्यस्थितीस मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांच्या अनुदाना पुरती उरलेली असल्याचे दिसून येत आहे. तसेच ग्राहकांना नवीन पासबुक आणि एटीएम कार्ड देण्याचे सांगून प्रत्येक शेतकरी खातेदाराकडून एक हजार रुपयांची आकारणी केली जात आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पासबुक किंवा एटीएम कार्ड देण्यात आलेच नाही पासबुक व एटीएम संदर्भात विचारणा केली आसता आमच्या कडे पासबुक नाहीत एटीएम पण नाहीत आसे सांगण्यात येते पासबुक मागितेले तर आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडुन प्रिटर मशिन भेटली नाही आसे येतील कर्मचारी म्हणतात लवकरात लवकर पासबुक एटीएम प्रिंटर मशिन द्यावे नाही दिल्यास सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याच्या तयारीत आहेत