Home यवतमाळ डॉ. निरज वाघमारे यांना “विदर्भ आयडॉल” आणि स्वामी विवेकनंद युवा पुरस्कार जाहीर….

डॉ. निरज वाघमारे यांना “विदर्भ आयडॉल” आणि स्वामी विवेकनंद युवा पुरस्कार जाहीर….

505

 

यवतमाळ / प्रतिनिधी
अत्यअल्पावधीत सामाजिक क्षेत्रात आपला अमित ठसा उमटवून युवकांमध्ये क्रेझ निर्माण करणारे यवतमाळ शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रसार माध्यम असलेल्या ऑन धिस मिडिया या संस्थेमार्फत विदर्भ आयडॉल हा पुरस्कार घोषित करण्यात आला. ऑन धिस मिडिया या संस्थेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवकांना “विदर्भ आयडॉल” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. यातच यवतमाळातील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख प्राप्त असलेले डॉ. निरज वाघमारे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत या संस्थेने सन 2022 चा ” विदर्भ आयडॉल ” हा पुरस्कार डॉ. निरज वाघमारे यांना देण्याचे जाहीर केले आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या ११ सप्टेंबर रोजी नागपूर येथील हॉटेल ली मेरिडियन येथे नाम फाउंडेशन संस्थेचे संस्थापक तथा मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या “समता साहित्य अकादमी” या संस्थेकडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या युवकांना स्वामी विवेकानंद यांच्या नावाने “स्वामी विवेकानंद नॅशनल अवॉर्ड” दिल्या जात असतो. तर या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रातून या संस्थेने डॉ. निरज वाघमारे यांची निवड केलेली आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता नागपुरातील हॉटेल हरदेव या ठिकाणी होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. विकास महात्मे, पद्मश्री आगुस इंद्रा उदयाना, पद्मश्री वरप्पा नब्बा यांच्या यांच्यासह या संस्थेचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. निरज वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दोन विविध संस्थांनी जाहीर केलेल्या पुरस्काराबाबत डॉ. वाघमारे यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरावरून डॉ. वाघमारे यांचे कौतुक करण्यात येत आहे…