Home यवतमाळ घाटंजी येथील न्यायालयाकडुन चार कर्मचारी आरोपींची निर्दोष मुक्तता..!

घाटंजी येथील न्यायालयाकडुन चार कर्मचारी आरोपींची निर्दोष मुक्तता..!

309

 

➡️ दिवाणी व फौजदारी न्यायाधिश अतुल उत्पात यांचे आदेश.!

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील मानोली येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट निवडणूकीत निवडणूक कर्मचारी आरोपी शैलेश मडावी (३२) वाघापुर यवतमाळ, दिलीप मानगांवकर (५८) पार्डी – जांब, कोंडबा मडावी (४७) अंबानगरी घाटंजी व अमित वानखडे (३१) नुक्ती या चार आरोपींना घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १५१ चे कलम १३४ प्रकरणात पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी शैलेश मडावी व ईतर कर्मचारी आरोपींची बाजु ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात मांडली.
तालुक्यातील मानोली येथे दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक पोट निवडणूक २५ मार्च २०१५ रोजी होती. त्यावेळी क्षेत्रिय अधिकारी म्हणून व्ही. एल. कुंटावार कार्यरत होते. मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून शैलेश मडावी हे होते. तर ईतर दोन आरोपी कर्मचारी सुद्धा मतदान केंद्रावर कार्यरत होते. यातील चारही आरोपींनी मतदान केंद्रावर मतदान पुर्ण झाल्यावर पाकीटे सिल करुन शासकीय वाहनाची वाट न पाहता निवडणूक साहित्य घेऊन खाजगी मोटर सायकलने सायंकाळी सहा वाजता घाटंजी येथील सांस्कृतिक भवन येथे जमा केले. सदरचे खाजगी दुचाकी वाहन आरोपी शैलेश मडावी हे चालवत होते. तसेच दुचाकी वाहनावर आरोपी दिलीप मानगांवकर हे बसुन होते. सदर कृत्यामुळे मौजा मानोली येथील ग्रामस्थांनी ईतर दोन केंद्रातील निवडणूक साहित्य व कर्मचाऱ्यांना अडवुन ठेवले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याने संशयीत आरोपी शैलेश मडावी, दिलीप मानगांवकर, कोंडबा मडावी व अमित वानखडे विरुद्ध अपराध क्रमांक ३१०७/२०१५ रोजी लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास जमादार एस. बी. कुडमेथे यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षांतर्फे घाटंजी तहसीलदार यांच्या तोंडी आदेशावरुन कान्होबा कुमरे यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी आरोपी शैलेश मडावी, दिलीप मानगांवकर, कोंडबा मडावी व अमित वानखडे आदींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तथापि, कलम ४३७ अ नुसार आरोपींनी पुढील सहा महिण्याकरीता प्रत्येकी ७५०० रुपयांचा जामीन कदबे न्यायालयाला देण्याचे आदेश सुद्धा दिवाणी व फौजदारी न्यायाधिश अतुल उत्पात यांनी दिले आहे. आरोपी शैलेश मडावी व ईतर आरोपीतर्फे ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.