Home यवतमाळ यवतमाळ येथे आम आदमी पक्षाच्या मेळाव्यास प्रतिसाद…!

यवतमाळ येथे आम आदमी पक्षाच्या मेळाव्यास प्रतिसाद…!

253

 

यवतमाळ : आम आदमी पार्टी च्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक ११मे यवतमाळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.


आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, प्रदेश संयोजक रंगा राजुरे , प्रदेश सचिव धनंजय शिंदे, संघटन मंत्री विजय कुंभार, विदर्भ प्रमुख देवेंद्रजी वानखडे , जिल्हाध्यक्ष वसंतरावजी ढोके , जिल्हा सचिव अँड मनीष माहुलकर, संघटन मंत्री श्री गुंड अलवार, यवतमाळ शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदुरकर, सर्व तालुका संयोजक व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रदेश प्रभारी सिंगला म्हणाले, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राबवलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आव्हान केले, यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतरावजी ढोके यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले , मेळाव्यात काही मान्यवर* *लोकांचा पक्ष प्रवेश पण करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..