Home यवतमाळ घाटंजी पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगारावर धाड टाकून दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला..!

घाटंजी पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगारावर धाड टाकून दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला..!

296

 

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी येथील पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगार सट्यावर धाड टाकून 1 लाख 44 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अखील सुधीर सुचक, संत मारोती वार्ड, घाटंजी (37), रोशन गजानन वातीले, जेसीस काँलनी, घाटंजी (24) या दोन आरोपींना अटक करून त्यांचे जवळुन लॅपटॉप, मोबाईल, पाँवर बँक,अँक्टीव्हा, चार्जर, रोख 2200 रुपये असा एकूण दिड लाख रुपयाचा मुद्देमाल घाटंजी पोलीसांनी जप्त करुन आरोपी विरूध्द कलम 12 (अ) जुगार कायदयातंर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. दरम्यान, आयपिएल सट्टा जुगार प्रकरणी अमीत, गजु या सह आणखी 15/16 आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता घाटंजी पोलिसांनी वर्तवली आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम हे पुढील तपास करीत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील चोरंबा रोड वरील गणेश खापर्डे यांच्या शेतात हनुमान मंदीराच्या आडोशाला टिनाच्या शेड मध्ये दोन इसम त्यांचे लँपटाँप व मोबाईल वर बोलुन मोबाईल फोन द्वारे पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपिएल 20/20 क्रिकेट मँचचे मोबाईल मध्ये थेट प्रक्षेपण पाहुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सौदे करुन हार – जीत क्रिकेट सट्टा जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डाँ. खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील (पांढरकवडा), ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम, जमादार राहुल खंडागळे, पोलीस शिपाई विशाल वाढई हे पुढील तपास करीत आहे.