Home यवतमाळ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत सुरस्कार यांची निवड

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत सुरस्कार यांची निवड

267

दारव्हा (प्रतिनिधी):-तालुक्यातील मानकोपरा येथील प्रशांत सूरस्कार यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांनी सुरसकार यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य तसेच जिल्हा कार्यकारणीच्या पद निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत सुरस्कार रा.मानकोपरा यांची निवड करण्यात आली.
सुरस्कार यांनी ग्रामीण भागातील आणि तळागाळातील वंचित समाजात संत रोहिदास महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व त्यांचे विचार चर्मकार महासंघाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम चांगल्या प्रकारे केले आहे संघाच्या माध्यमातून वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी ते तत्पर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे या निवड प्रक्रियेच्या वेळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.