
.रवींद्र साखरे
आर्वी / वर्धा – मागील चार वर्षापासुन तळेगाव ते आर्वी रोडचे काम बंद पडून आहे. मंजुरी मिळाली तेव्हापासुन ते आता पर्यंत अनेकदा काम बंद पडले व नंतर ते सुरू झाले. तसेच ज्या ज्या वेळेला पावसाळा सुरू झाला अगदी त्या वेळेला काम बंद केले गेले. संपूर्ण रोडच फक्त खोदकाम सुरू आहे रोड पूर्ण व्हायला किती वेळ लागेल यावर कुणी बोलायला तयार नाही. रोड साठी आलेला निधीचे काय केले हे कुणी सांगत नाही. मात्र याचा त्रास सर्व सामान्य जनतेला इतका आहे की आर्वी ला येणारे वर्षातून एक किंवा दोन वेळा येणार आहे पाहुणे आर्वीला येण्याअगोदर फोन करून विचारतात ती रस्त्याचे काम पूर्ण झाले का नाहीतर आम्ही दुसऱ्या मार्गाने येतो कारण की चार चाकी वाहनाने येण्याकरिता ही भयानक त्रास सहन करावा लागतो यावरून हे लक्षात येते की या रोड वरून दररोज प्रवास करणारे प्रवाशांचे व वाहनांचे किती भयानक हाल होत असतील याची जाणीव प्रशासनाला असून सुद्धा रस्त्याच्या कामात काहीच प्रगती नाही मागील चार वर्षात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला.
त्यासाठी आज दी. 23_मार्च ला शहीद ए आजम भगत सिंह यांच्या फोटोला अभिवादन करून आर्वी तळेगाव रस्त्यावर भव्य चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
मुर्दाड कुंभकरणी प्रशासन व कंत्राटदाराच्या विरोधात यावेळी घोषणा देत टायर जाळत 2 तास रस्ता बंद ठेवण्यात आला.यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार,नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. गेली 4 वर्ष या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबलेले आहे. जिल्ह्यातील आमदार,खासदार या विषयावर बोलायला तयार नाही. या रस्त्याशी संबंधित अधिकारी काहीही स्पष्ट बोलताना दिसत नाही. या तीन वर्षात अनेक एक प्रकारचे आंदोलन झाले आहे तरीही संबंधित प्रशासन अधिकारी कुंभकर्णी झोप घेत आहे या प्रशासनाला जागं करण्यासाठी आज परत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.2 तास चाललेल्या या आंदोलनाला नायब तहसीलदार यांनी भेट देत आम्ही समंधीत अधिकाऱ्यांशी आपली बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर महामार्ग प्रवाशांसाठी खुला केला गेला. त्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देत येत्या 8 दिवसात संबंधित मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर बोरकर साहेब व संबंधित कंत्राटदार यांनी स्थानिक आर्वी येथे कृती समितीसोबत बैठक लावून चर्चा करावी अन्यथा कृती समिती हजारो कार्यकर्त्यांसह मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर यांच्या कार्यालयाला घेराव घालत कार्यालयाला टाळे ठोकेल असा निर्वाणीचा इशारा यावेळी दिला गेला.
यावेळी संभाजी ब्रिगेड ,एम आई एम, भीम टायगर सेना, तळेगाव शामजी पंत येथील सच बोल सच तोल ग्रुप, वंचित बहुजन आघाडी सहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त आंदोलनात सहभागी होते.










































