Home महत्वाची बातमी 110 बॅच मधील पोलीस उपनिरीक्षकांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी झाली पदोन्नती

110 बॅच मधील पोलीस उपनिरीक्षकांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी झाली पदोन्नती

639

प्रमोद वाघमारे यांच्या मागणीला आले यश…!

उस्मानाबाद – खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या ( D.D. ) पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील 110 बॅचचे पास झालेले एकूण 775 पोलीस उपनिरीक्षक यांचे दिनांक 13 / 10 / 2013 रोजी प्रशिक्षण सुरू झाले आणि दिनांक 14 / 08 / 2014 रोजी हे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. या 775 पोलीस उपनिरीक्षकांची जवळ जवळ 7 वर्षे सेवा पूर्ण झाली होती. तरीही अद्यापही यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली नसल्यामुळे या बॅच मधील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता.

तसे पाहिले तर या अगोदरची बॅच क्रमांक 100 , 101 आणि 102 मधील पोलीस उपनिरीक्षकांची 3 ते 4 वर्षातच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती. त्यामुळे 7 वर्षे सेवा होऊन देखील आमची पदोन्नती का झाली नाही असा सवाल बॅच क्रमांक 110 मधील पोलीस उपनिरीक्षक विचारत होते.

अखेर हा मुद्दा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी उचलून धरला आणि दिनांक 06 जानेवारी 2022 रोजी बॅच क्रमांक 110 मधील 775 पोलीस उपनिरीक्षक यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी तत्काळ पदोन्नती देऊन या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब तसेच तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे साहेब यांना देऊन पाठपुरावा सुरू ठेवला तसेच पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे याच मागणीचे निवेदन वेगवेगळ्या जिल्ह्यातून तेथील जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्फत गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक साहेब यांना देण्यात आले.

अखेर प्रमोद वाघमारे यांच्या मागणीला जोरदार यश आले असून आज दिनांक 22 / 03 / 2022 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने या 110 बॅच मधील पोलीस उपनिरीक्षक यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याची यादी काढली असून हा मुद्दा उचलून शासनाला मागणी केल्याबद्दल पदोन्नती झालेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी फोन करून प्रमोद वाघमारे यांचे आभार मानले आहेत. तसेच पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या असून. आपण यापुढेही महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.