
यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशन व आकाश चिकटे हॉकी अकॅडमी तर्फे स्वर्गीय मनोहर भटकर स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक सतरा ते वीस मार्च रोजी पुरुष व महिलांच्या एकत्रित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अभ्यंकर कन्या शाळेत आयोजित करण्यात आला या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्षस्थानी साई विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मनोज इंगोले प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पिंटू भाऊ बांगर सोबतच यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे सहसचिव नायब तहसीलदार राष्ट्रीय खेळाडू देवेंद्र चा पेरिया व क्रीडा अधिकारी त्रिवेनी बांते उपस्थित होत्या

चार दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला या स्पर्धा सकाळ व संध्याकाळ दोन सत्रांमध्ये लिक पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत आजी माजी राष्ट्रीय हॉकीपटूंना सहभाग घेतला या स्पर्धेत प्रथम क्रमांक शहीद इलेव्हन ने प्राप्त केला द्वितीय क्रमांक गौरव इलेव्हन तिने प्राप्त केला तृतीय पारितोषिकाचे मानकरी अजय इलेव्हन संघ ठरला या तिन्ही संघांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले खेलो इंडिया च्या प्रशिक्षक पदी निवड झालेल्या रूपाली तिरपुडे व गौरव निंबाळकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रीय खेळाडू जितू खोबरागडे रूपाली तिरपुडे स्वामिनी कुळकर्णी समीक्षा खंडारे शिल्पा राठोड जाधव खुशी जाधव तनुष्री कडून साक्षी राऊत तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक ब गुड्डू मीर विकास शेळके उपस्थित होते तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून याला गौरविण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अभ्यंकर कन्या शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खेळाडू पालक व शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित होते.











































