Home यवतमाळ 41 वर्षानंतर एकत्र आले 1981 च्या भरतीतील पोलीस मित्र

41 वर्षानंतर एकत्र आले 1981 च्या भरतीतील पोलीस मित्र

328

 

यवतमाळ – सन 1981 ला यवतमाळ पोलीस दलात भरर्ती झाल्यानंतर 1 वर्षे प्रशिक्षणानंतर लगेच नेमणुक झाल्याने ताटापुट झाली, उमेदीचा काळ होता. सर्व आप आपल्या नौकरीत व कौटूंबिक जिवनात व्यस्त झाले. मागे पुढे जन्म तारखा वेगवेगळ्या असल्याने वेगवेगळ्या तारखेला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. 40 पैकी 15 ची देवाज्ञा झाली. परंतु जे हय्यात आहेत असे 25 मित्र 41 वर्षाने 13/3/22 रोजी एकत्र आले जसे काही आज पोलीस भरतीला नव्या उमेदीने येतो. तसे सर्वच्या सर्व उत्साहात होते. हा उत्सव म्हणजे एक चिरकाळ स्मृतीबंध आहे. असे यावेळी समारंभाचे अध्यक्ष सिनियर पोलीस निरीक्षक नंदकिशोर शर्मा अमरावती यांनी सांगितले.
यवतमाळ पोलीस दलात 13/3/1981 रोजी भरती झालेल्या सहकार्‍यांचा 13/3/2022 रोजी हॉटेल एकविरा लॉन, दारव्हा रोड यवतमाळ येथे प्रत्येकांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करुन स्नेहमिलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश कळसकर होते तर सुत्र संचालन एम. देशमुख यांनी केले तसेच सर्व 25 ही कर्मचार्‍यांचा परिचय करुन दिला. सर्व आलेल्या सेवानिवृत्तांच्या न बोलवता ही जे मान्यवर आले त्यांचा सुद्धा शाळ श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच या सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घेत ग्रुप फोटो काढले तसेच सर्वांच्या विनंतीला मान देवून आलेल्यांचे विजय ढाके, दिनकर चौधरी मामा यांचे आभार मानले व संचलन डी.एम देशमुख यानी केले असुन यावेळी अध्यक्ष नंदकिशोर शर्मा, सिनियर पो. नि. प्रमुख अतिथी महेश कळसकर, स. पो. उ. नि. करीम बेग मिर्झा, सि. पो. निरीक्षक लीलाधर दायमा, मारोती केवटे, सुभाष कामटकर, सुरेश मोहोड, अशोक बायस्कर, नंदु वानखडे, सतीश पाली, राजेंद्र पाठक, त्र्यंबक कांदेकर, भास्कर तिवारी, विजय मिश्रा, राजु गोहकार, रामदास कांबळे, गुलाब पंदरे, महेश तायडे, दशरथ जाधव, जमीर मोहम्मद जेष्ठ पोलीस कर्मचारी, अजीजखॉं पठाण, दिपक देशमुख पोलीस मित्र, सादिक खान, आतिक अहमद, अफसर खान आदि उपस्थित होते.