Home जळगाव खिर्डी येथे पत्रकाराने वाचवले पक्षाचे प्राण: भूतदया

खिर्डी येथे पत्रकाराने वाचवले पक्षाचे प्राण: भूतदया

252

 

रावेर (शेख शरीफ)

रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान परिसरात दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास पतंगाच्या दोऱ्यामध्ये अडकून खाली पडलेल्या कबुतर (होलगा) हा पक्षी जख्मी अवस्थेत पक्षीमित्र पत्रकार सादिक पिंजारी यांना आढळून आला असता यावेळी पक्षाची पाहणी केली त्यादरम्यान त्यांचे एका पंखावर मोठ्या जखमा आढळून आल्यामुळे त्याला अक्षरशः पुर्ण पणे उडता येत नसल्याने वेळीच पक्षीमित्र पत्रकार सादिक पिंजारी यांनी तात्काळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेवून कबुतरावरती प्रथमोपचार पशु आरोग्य सेवक सुपडू तायडे यांनी केले पक्षाला दोन तिन दिवस पक्षाची देखभाल करून त्याला मलमपट्टी करावी असे सुपडू तायडे यांनी सांगितले व त्या कबुतराला श्रीकृष्ण मंदिर संस्थान येथे ठेवण्यात आले या वेळी सादिक पिंजारी , प्रदीप महाराज पंजाबी, प्रविण शेलोडे, भिमराव कोचुरे आदी उपस्थित होते.