Home महत्वाची बातमी आजोबाला राग आला अन , विपरितच घडलं ,

आजोबाला राग आला अन , विपरितच घडलं ,

1287

 

जेवन उशिरा का केला म्हणून आजोबाने आजीचे हाथ पाय बांधून जिवंत जाळले , 

 

आजोबा ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या , 

अमीन शाह

हिंगोली : स्वयंपाक करण्यास उशीर केल्याच्या क्षुल्लक कारणावरून ८० वर्षीय पतीने आपल्या ७८ वर्षीय पत्नीस हात – पाय बांधून रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील सवना येथे उघडकीस आली घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या खून प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीस अवघ्या काही तासांत अटक केली आहे . सेनगाव तालुक्यातील सवना येथे कुंडलिक शिवराम नायक ( वय ८० ) व सुंदराबाई कुंडलिक नायक ( ७८ ) हे वृध्द दाम्पत्य राहते . त्यांना पाच मुली असून मुलगा नाही . सर्व मुलींची लग्नं झाली आहेत . त्यामुळे ते दोघेच एकत्र राहतात . कुंडलिक नायक हा रागीट स्वभावाचा आहे . त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमी कुरबुरी होत असे . रात्री स्वयंपाक उशिरा केल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले . या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात कुंडलिकने पत्नी सुंदराबाई हिचे हात – पाय बांधून अंगावर रॉकेल ओतले . त्यानंतर पेटवून देत जिवंत जाळले त्यातच तिचा मृत्यू झाला , अशी फिर्याद मयत महिलेची मुलगी सरिता पंजाबराव वाघ ( रा . शिरपूर जैन , जि.वाशिम ) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली . त्यावरून आरोपी कुंडलिक शिवराम नायक याच्याविरुध्द गुरनं ३२ / २२ , कलम ३०२ भादंविप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला . अवघ्या काही तासात आरोपीस अटक करण्यात आली . या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील करीत आहेत . तपासात उपनिरीक्षक बाबूराव जाधव , राहुल गोटरे , पोलीस हवालदार काशिनाथ शिंदे व पोलीस नाईक हे सहकार्य करीत आहेत ,