
मनिष गुडधे , अमरावती – 8999776984
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस वसाहती चे उद्घाटन लोकार्पण करण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हस्ते नुकताच पार पडला आहे. यावेळी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज तेलगोटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार सह कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान पोलिस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या हस्ते पोलिस स्टेशन मधील तपासी अधिकारी कक्ष, क्राईम कक्ष, वाहन पार्किंग शेड उद्घाटन देखील यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच नवीन वसाहत मधील गार्डन यासह परिसरातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस पाटील सह पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक देखील पार पडली.
या बैठकीला संबोधित करताना माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परिसरातील गुन्हेगारी कशी घडते यासोबतच या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिस पाटलांनी आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने कार्य व काम करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाची घडामोडी आणि कामाचा आढावा देखील यादरम्यान घेतला. यावेळी ठाणेदार तेलगोटे यांनी अनेक सामाजिक त्याचप्रमाणे दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती देखील दिली.
लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत होत असलेल्या कामाचा आढावा देखील घेतला त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले.
या सोहळ्याला मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यासह पोलीस पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान मंगरूळ दस्तगीर परिसरातील नागरिकांनी देखील माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांना सन्मानित केले. यावेळी पोलिस आणि नागरिकांनी मधला संवाद सलोख्याचा असल्याचा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला.










































