Home जळगाव टिपू सुलतान बद्दल अपमानजनक शब्द वापरणाऱ्या देवेंद्र फडणवीस वर कारवाई करण्याची मांगणी...

टिपू सुलतान बद्दल अपमानजनक शब्द वापरणाऱ्या देवेंद्र फडणवीस वर कारवाई करण्याची मांगणी ; तहसीलदारांना दिले निवेदन…

421

रावेर ( शेख शरीफ)

राज्याचे विरधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी टिपू सुलतान बद्दल अपमानजनक शब्दप्रयोग केला त्याबददल देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करावी अशा मांगणीचे निवेदन टिपू सुलतान प्रेमिंकडून जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे तहसीदारांना देण्यात आले.
निवेदनात मुंबई येथे एका मैदानाला स्वातंत्र्य सेनानी ह. टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले. त्याचे स्वागत. परंतू या नामकरणाला विरोध करणाऱ्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस व विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रथम स्वतंत्र्य सेनानी ह. टिपू सुलतान बद्दल टि. व्ही. चैनल शि बोलतांना आपली प्रतिक्रीया देतेवेळी अपशब्द वापरले व टिपू सुलतानबद्दल खोटा इतिहास सांगून बदनामी केली. यामूळे ह. टिपू सुलतान प्रेमिंची भावना दुखावल्या गेल्या आहे. व एकाप्रकारे ही महामानवांची बदनामी करून संपूर्ण राज्यात वेशाच राजकारण करू पाहत आहे व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.म्हणून देवेद्र फडणविस व प्रविण दरेकर यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी. अन्यथा टिपू सुलतान प्रेमिकडून संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
त्यावेळी बोदवड शहरातील टिपू सुलतान प्रेमी व शहरातील नवयुवक उपस्थित होते.