
API Vinod Chavan, Police Station officer, Parwa Dist. Yavatmal.
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – सन 1832 सालापासून आज पावेतो जवळपास 200 वर्षांचा समृद्ध इतिहास या पत्रकार क्षेत्राला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारे या क्षेत्राला इतर 3 स्थंभासारखे (कायदेमंडळ, न्यायव्यवस्था व कार्यकारी व्यवस्था) कोणताही स्वतंत्रपणे भक्कम आधार नाही. कार्यपद्धती नाही आणि कोणतेही संरक्षण सूद्धा नाही. पुरोगामी महाराष्ट्र मध्ये खूप काही काळ गेल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा विकसित झाला आहे. त्यामध्ये पत्रकार संस्था कार्यालय ईत्यादी संरक्षण केले गेले. आज परिस्थिती पाहता पत्रकार म्हणून काम करतांना कितीतरी सरकारी योजना मधील उणिवा लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम या व्यवस्थेमधून झालेले आहे व ते निरंतर सुरूच आहे व राहील, असे दिसते.
⚫ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी इंग्रजी सत्ताधारी यांना स्थानिकांच्या अडचणी व भावना कळाव्यात म्हणून त्या काळी सूद्धा दर्पण मधून काही स्तंभ इंग्रजी मधून लिहले जात होते. आर्थीक अडचणी मूळे 7 – 8 वर्ष पूढे ते सन 1840 साली दर्पण बंद झाले. परंतू दर्पणने मराठी वृत्तपत्र व्यवस्थेचा पाया रोवला. पूढे अनेक वर्षांच्या प्रवासा नंतर महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रे दैनिक सकाळ (सन 1932, डॉ. नानासाहेब परूळेकर) दैनिक पूढारी (सन 1937 साली) कोल्हापूर येथून तर महाराष्ट्र टाईम्स सन 1962 (टाईम्स समूह), दैनिक लोकमत (सन 1971, स्व. जवाहरलाल दर्डा) आणि विदर्भातील नामांकित वर्तमानपत्र दैनिक देशोन्नती, दैनिक पुण्यनगरी असा खूप मोठा प्रवास या वृत्तपत्रांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील वाचकांनी देखील या सर्वच वृत्तपत्रांचे वाचन करतांना प्रादेशिक पंसती दाखवली. वाचकांनी दैनिक सकाळला अधिक पसंती दिली आहे, तर मराठवाड्यातील जनता दैनिक लोकमत, तर विदर्भात दैनिक देशोन्नती वृत्तपत्राला अधिक पसंती देतांना दिसतात, असे दिसुन येते. कोल्हापूर, सातारा व सांगली येथे दैनिक पूढारी या वर्तमान पत्राला मोठ्या प्रमाणात वाचकांनी स्विकारला गेला आहे. सामान्य वाचकांचा दैनिक पूण्यनगरी, तर उच्चभ्रु लोकांचा दैनिक लोकसत्ता, दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांनी आपली जागा निश्चीत केलेली आहे. मनोरंजनाचे संध्यानंदला काही घटकांनी स्विकारलेले आहे. वृत्तपत्राचा हा प्रवास मासिक, साप्ताहिक, दैनिक, सायं दैनिक, मॉर्निंग बूलेटीन, आफ्टरनून बूलेटीन ईत्यादी पर्यंत येवून पूढे निरंतर सूरूच आहे व राहील, यात तिळमात्र शंका नाही.
⚫ पत्रकारीता क्षेत्र हे अतिशय जबाबदारीचे क्षेत्र आहे व आजवर राहीलेले आहे. जसे इंटरनेट, यू ट्यूब चॅनल, सोशल मिडीया, व्हॉटसअँप, फेसबुक, ट्वीटर ईत्यादी समाज माध्यमे आली. तेव्हा पासून पांरपारिक पत्रकारितेला नव्याने संघर्ष उभा ठाकलेला दिसून येतो. भविष्यात काय खरे आणि काय खोटे कळायला मार्ग दिसेल कां याचे उत्तर निश्चीतपणे मिळेल, यात शंका येते. प्रामाणिकपणे वार्तांकन करणारे पत्रकारांचे हात मोठ मोठ्या जाहिरातदार यांचे विषयी व विरुद्ध बातमी लिहतांना थरकाप करतील काय, या बाबतही मनात शंका येते. सरकारी योजना मधील भ्रष्टाचार, गोरगरिबांवर, वंचित घटकांवर, महिला, आदिवासी, विकास योजना बालकांचे शेतमजूरांचे प्रश्न यावर लिहतांना समस्या, कारणे व उपाय सूचवणे या माध्यमातून काम होईल की टारगेट करून एखाद्याला संपवणे हा विषय होईल याबाबतीत देखील आज संभ्रम निर्माण होत आहे.
⚫ असिम प्रगल्भता उत्तम वैचारिकता व राष्ट्रीय चारित्र्य याचे वसा व वारसा घेवून दैनंदिन आयुष्य जगणारे असंख्य पत्रकार आहे. परंतू हाताचे बोटावर मोजणारे जर तुम्ही हे केले नाही, तर मी असे करेन असे प्रश्नार्थक पत्रकार मोजकेच असले तरी त्यांनी या क्षेत्राला सूरूंग लावणे सुरू केले आहे. परिणामी आजवर अनेक दूर्घटना झाल्या जाणिव पूर्वक टारगेट केल्याने खचून जावून अनेकांनी बदनामीचे भितीने आत्महत्या केल्या आहे, तर किती जनांवर प्राणघातक हल्ले सूद्धा झाले आहे. त्यामूळे या क्षेत्राला सूद्धा तातडीने संरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे, असे दिसुन येते.
⚫ पोलीस अधिकारी म्हणून नोकरीत असतांना अनेक पत्रकार बांधव माझे चांगले मित्र आहेत. प्रत्येकाचे समस्या खूप वेगवेगळ्या आहेत. अतिशय चांगली बुद्धीमत्ता असतांना सुद्धा नोकरीची संधी गेली म्हणून पत्रकार तर नोकरी करत असतांना दैनिक प्रतिनिधी म्हणून काम करणारे (संरक्षण कवच) पत्रकार बांधव आहेत. काहींनी तर पत्रकारिता हे व्रत स्विकारलेले आहे. दंगल सदृष्य परिस्थीती मध्ये ही बातमी गोळा करणारे, दमछाक होई पर्यंत बाईट साठी तळमळणारे बातमी मागील, बातमी शोधणारे अनेक पत्रकार बांधवांना आम्ही ओळखतो. प्रत्येकाचा आदर, सन्मान व मैत्री होणे शक्य जरी नसले, तरी पत्रकार म्हणून काम करणारे सर्वच घटकांचा वार्ताहार, बातमीदार, उप संपादक, संपादक यांचा मनापासून आदर आहे.
⚫ समाजातील गोरगरिब जनतेचा खरा आवाज महिलां, मुलींचे संरक्षण, अदिवासींचे हक्क व विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे एकमेव साधन पत्रकार बांधव आहेत. आज पत्रकारांमूळे प्रशासकीय व्यवस्थेला सूद्धा पारदर्शकता आलेली आहे. पत्रकारांनी निर्माण केलेला एक वैचारिक दबाव शासन व्यवस्थेला सरळ मार्गी लोकांचे प्रश्न सोडविणे कामी भाग पाडतो. यातच पत्रकारितेचे यश सामावलेले आहे. आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करतो व महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण यांनी पत्रकारांना शुभेच्छा देतांना म्हटले आहे.










































