
जालना- अंबड रोडवर गोलापांगरीजवळ भरदिवसा लूटमार
जालना – लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी आज पंधरा लाख रुपयांची रक्कम दोन कर्मचाऱ्यांमार्फत मोटरसायकलवरून पाठविण्यात आली होती. रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोटरसायकल गोलापांगरीजवळील एका इंग्रजी शाळेजवळ मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी अडवून मारहाण केली व पैशाची बॅग घेऊन पसार झाले.घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.











































