Home मराठवाडा जालना पोलिस दलातील सेवानिवृत्त फौजदार अरविंद झावरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जालना पोलिस दलातील सेवानिवृत्त फौजदार अरविंद झावरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

399

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अरविंद भाऊराव झावरे यांचे आज शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने औरंगाबाद येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. मृत्यसमयी त्यांचे वय ५७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वासुंदा येथील मूळ रहिवाशी असलेले अरविंद झावरे यांनी तीन वर्षांपूर्वी पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांना पोलीस दलासह मित्रपरिवारामध्ये दादा म्हणून सर्वजण ओळखत.