Home विदर्भ समारंभ आयोजन, नियाेजन कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी विशाल बावनथडे

समारंभ आयोजन, नियाेजन कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी विशाल बावनथडे

482

यवतमाळ / प्रतिनिधी
समारंभ आयोजन, नियोजन कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी येथील विशाल बावनथडे यांची नियुक्ती 7 नोव्हेबर रोजी मुंबई येथे समारंभ कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख दीपक शिर्के यांच्या हस्ते करण्यात आली.
दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे समारंभ कामगार सेनेचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक सेवेत कार्यरत असणारे मान्यवरांना उपस्थित केले होते. त्या वेळी कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल बावनथडे यांची जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली .
असंघटीत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे कार्य समारंभ आयोजन नियोजन कामगार सेना ही संघटना प्रामाणिकपणे कार्यरत आहे. या कामाची जबाबदारी जिल्हा प्रमुख यांच्यावर कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोपविली असून समारंभ आयोजक नियोजक कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख दिपक शिर्के, सरचिटणीस बॉबी ठक्कर, कोषाध्यक्ष इम्तीहानभाई, विदर्भ प्रमुख सतीश पवार यांनी नियुक्ती पत्र देवून विशाल बावनथडे जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित रहीम खान अमरावती प्रवीण गोसावी, विनोद सावंत, सत्यजित सावंत यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.